[ad_1]
Rajinikanth Upcoming Film: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलायवा अशी ओळख असणारे अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) हे चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या जेलर (Jailer) चित्रपटाच्या यशानंतर आता त्यांच्या आगामी चित्रपटाची (Rajinikanth Upcoming Film) घोषणा करण्यात आली आहे. ‘थलैवर 171’ (Thalaivar 171) असं या चित्रपटाचं नाव आहे.
प्रोडक्शन हाऊस सन पिक्चर्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर ‘थलैवर 171’ या चित्रपटाची माहिती दिली आहे. ‘थलैवर 171’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन सन पिक्चर्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आम्ही सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘थलैवर 171’ या चित्रपटाची घोषणा करत आहोत. ही फिल्म लोकेश कंगराज डायरेक्ट करत आहे. त्यांनीच हा चित्रपट लिहिला आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी या चित्रपटाला म्युझिक दिलं आहे.या चित्रपटामधील अॅक्शन सीन्सची जबाबदारी स्टंट मास्टर Anbariv यांना देणार आली आहे.
‘थलैवर 171’ चं जवानसोबत आहे खास कनेक्शन
शाहरुख खानच्या जवान या चित्रपटासोबत ‘थलैवर 171’ या चित्रपटाचे खास कनेक्शन आहे. ‘जवान’ चित्रपटाला उत्कृष्ट संगीत देणारा अनिरुद्ध रविचंदर हा ‘थलैवर 171’ या चित्रपटाला देखील संगीत देत आहे.
We are happy to announce Superstar @rajinikanth’s #Thalaivar171
Written & Directed by @Dir_Lokesh
An @anirudhofficial musical
Action by @anbariv pic.twitter.com/fNGCUZq1xi
— Sun Pictures (@sunpictures) September 11, 2023
रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. जेलर चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासोबतच तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, वसंत रवी यांनी प्रमुख भूमिका साकारली. आता रजनीकांत यांच्या ‘थलैवर 171’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अजून या चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल तसेच या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
‘जेलर’ मधील गाण्याला मिळाली प्रेक्षकांची पसंती
‘जेलर’ या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील ‘कावाला’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केले. रथामारे,जुजुबी ही गाणी देखील ‘जेलर’ या चित्रपटामध्ये आहेत.
सुपरस्टार रजनीकांत यांना जेलर चित्रपटासाठी 210 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. त्यानंतर ते देशातील सर्वात महागडे अभिनेते बनले आहेत. ‘जेलर’ चित्रपटामध्ये मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिव राजकुमार यांचे कॅमिओ रोल आहेत.
संबंधित बातम्या:
.
[ad_2]
Source link