[ad_1]
Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या सात दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडणार आणि आठवडाभर वरुण राजा हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी व्यक्त केलाय.
मुंबईतही या दरम्यान पाऊस पडेल. याशिवाय विदर्भातील बुलढणा, अकोला, अमरावती, वर्धा ,नागपुर ,यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल. तर मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, बीड परभणी ,जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस बरसेल, असा अंदाजही डख यांनी व्यक्त केला. शिवाय उत्तर महाराष्टात नाशिक , नंदुरबार आणि धुळ्यात पाऊस पडेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो, असंही डख यांनी स्पष्ट केलं.
पंजाबराव डख यांच्या आवाहनामधील प्रमुख मुद्दे
दररोज भाग बदलत हजेरी लावणार आहे .
ओढे, नाले, नद्या वाहतील असा पाऊस पडेल .
धरणाच्या पाण्यात वाढ होईल असा पाऊस पडेल .
जनतेने काळजी घ्यावी.
शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते , असंही डख यांनी सांगितलय.
जिल्ह्यात पावसाचे दमदार बॅटींग, पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दमदार कमबॅक केलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील तीन दिवस वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
राज्यात आज ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. तर काही ठिकाणी कडक ऊन पडल्याचे चित्र आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता, मात्र गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. आजही मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/eQSMipTCv6
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 18, 2024
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 18, 2024
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस/माघेगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४°C आणि २६°C च्या आसपास असेल.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 18, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link