अहमदनगर – खोटे आश्वासन व बेरोजगारीचा उच्चांक गाठल्याच्या निषेधार्थ व भाजप-शिवसेना सरकारचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने दि. 13 (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिली.
जिल्हा प्रभारी व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे व पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी 11 वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यात आमदार अरुण जगताप, वैभव पिचड, संग्राम जगताप व राहुल जगताप, तसेच माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, दादा कळमकर व पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, सुजित झावरे, उदय शेळके, प्रशांत गायकवाड, नीलेश लंके, शिवाजी गाडे आदी समर्थकांसह सहभागी होणार आहेत.