लक्ष्मी पूजनाच्या प्रियजनांना द्या ‘या’ खास शुभेच्छा; पाठवा ‘हे’ हटके मेसेजेस

[ad_1]

Laxmi Pujan Wishes in Marathi : आश्विन अमावस्येला दीपावली सण साजरा केला जातो आणि लक्ष्मी पूजन साजरं केलं जातं. यंदा लक्ष्मी पूजनाचा सण 1 नोव्हेंबरला साजरा करण्यात येत आहे. या दिवशी लक्ष्मीसह गणपती बाप्पाची पूजा केली जाते. दिवाळी हा सण उत्साहाचा, रोषणाईचा आणि दिव्यांचा मानला जातो. दिवाळीच्या दिवसांत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व असतं. या दिवशी तुम्ही तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा (Diwali Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता.

लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश (Laxmi Pujan Wishes In Marathi)

या लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय प्रसंगी तुमचं जीवन
समृद्ध, आनंदी आणि आरोग्यदायी होवो
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे
स्वागत घरोघरी होऊ दे….!
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला दीपावली आणि
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

देवी लक्ष्मी घेऊन आली
दारी सुख समृद्धीची बहार,
देवी करो पूर्ण तुमच्या
इच्छा आणि मनोकामना स्वीकार,
लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

झगमग-झगमग दिवे लागले,
दारोदारी आली दिवाळी,
दिवाळीच्या या शुभ दिवशी
तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे..
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मिठाई, फटाके आणि दिवे,
दिवाळी आहे सोनेरी,
लक्ष्मीपूजनात व्हा लीन,
वर्षभरानंतर आलं आहे लक्ष्मीपूजनाचं पर्व
लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना शुभेच्छा!

दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,
संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार,
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा…!

देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार,
देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार,
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा…!

दिव्यांचा हा सण आहे खास
तुम्हाला मिळो सुखांचा सहवास
लक्ष्मी आली आपल्या द्वारी,
करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार!
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या घरी होवो धनाची बरसात
होवो कोपऱ्याकोपऱ्यात लक्ष्मीचा वास
संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास
शुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन!

लक्ष्मीची होईल कृपा एवढी,
सगळीकडे होईल नाव
दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम
सर्व इच्छा होवो पूर्ण,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

हेही वाचा:

Happy Diwali 2024 Wishes : दिवाळीनिमित्त मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा; पाठवा ‘हे’ हटके मेसेजेस, फोटोज

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *