लैंगिक शोषण, पाहू शकता, पण किसिंग सीन नाही चालत; अभिनेत्रीचे सेन्सॉर बोर्डावर प्रश्न

[ad_1]

Zoya Akhtar Statement: बॉलीवुडची दिग्दर्शिका झोया अख्तर (Zoya Akhtar) ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतच तिने सिनेसृष्टीतल्या काही गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच तिने ओटीटी सेन्सॉरशिपवर प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे पुन्हा एकदा झोया अख्तर तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. 

झोयाचे अनेक सिनेमे आतापर्यंत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. तिच्या अनेक सिनेमांमधून आयुष्याच्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. पण सिनेमातील अनेक गोष्टीवर सेन्सॉर बोर्डाचं बंधन येतं. पण ओटीटी माध्यमांवर तसं नाही. याचसगळ्यावर झोयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यावर झोया अख्तरचे वडील जावेद अख्तर यांनी देखील तिला पाठिंबा दिला. त्यामुळे आता झोया अख्तरने आता सेन्सॉर बोर्डावरच प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं.                                                                 

झोया अख्तरने सेन्सॉरशिपवर केला प्रश्न उपस्थित

एक्सप्रेसोमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये झोयाने याविषयी भाष्य केलं आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, पडद्यावर महिलांवर अत्याचार, शोषण आणि लैंगिक छळ पाहतच ती मोठी झाली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी पडद्यावर दाखवणे ठीक आहे. पण किसिंग सीन दाखवणं चुकीचं आहे. दोन तरुण मुलांमधील प्रेम आणि शारीरिक जवळीक पाहण्याची परवानगी द्यायला हवी, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे तिने म्हटलं की, ‘प्रत्येक चित्रपटाची कथा दाखवण्याची दिग्दर्शकाची पद्धत वेगळी असते. अशा परिस्थितीत रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तेथे दाखवण्यात आलेला हिंसाचार  त्यांच्या काळाच्या खूप पुढचा होता. मग तुम्ही प्रेक्षकांना काय दाखवायचं आहे आणि जर आपण सांस्कृतिक फरकांबद्दल बोललो तर त्यामध्ये  फ्रेंच अमेरिकन लोकांपेक्षा आपण खूप पुढे आहोत. 

झोया अख्तरचे सिनेमे

झोया अख्तरने आतापर्यंत बॉलिवूडला ‘गली बॉय’, ‘दिल धडकने दो’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘लक बाय चान्स’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. झोया अख्तर ही अभिनेता फरहान अख्तरची बहीण आहे. दरम्यान झोयाचे वडील जावेद अख्तर यांनीही तिच्या या वक्तव्यासाठी तिला पाठिंबा दिला आहे. 

ही बातमी वाचा : 

Irina Rudakova : युक्रेन-रशियाच्या युद्धात वडील शहीद, मराठी शिकण्याचा अट्टाहास ते बिग बॉस मराठीचं घर; एबीपी माझासोबत इरीनाने उलगडला आयुष्याचा प्रवास

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *