लोकांना पिण्याचं पाणी पुरवण्याची जबाबदारी कुणाची? गोराईतील पाणी टंचाईबाबत हायकोर्टाचा सवाल

[ad_1]

Water Shortage in Gorai Village in Borivali West : मुंबई : बोरीवली पश्चिम (Borivali West) येथील गोराई गावातील (Gorai Village) पाणी टंचाईच्या प्रश्नाची हायकोर्टानं गंभीर दखल घेतलीय. जोपर्यंत तिथला पाणी पुरवठा सुरळीत होत (Inadequate Water Supply) नाही, तोपर्यंत दिवसातून दोनवेळा 10 टँकर्सनी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश हायकोर्टानं (Bombay High Court) मुंबई महापालिकेला दिले आहेत. गेली 10 वर्ष सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी इथं असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथम कायम असल्याचं रहिवाशांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. लोकप्रतिनिधींनी तलाव सुशोभीकरण आणि इतर कामांऐवजी पाण्याच्या मुद्याकडे लक्ष द्यायला हवं होतं, अशी खंतही त्यांनी एबीपी माझाकडे बोलून दाखवली आहे.

गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर या याचिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. गोराईतील रहिवाशांना वारंवार उद्भवणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई ही केवळ उन्हाळ्यापुरती मर्यादित नाही. वाढत्या तापमानासह उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी बिकट होत असल्याचा दावा याचिकेत केलेला आहे. कोळी बांधव, अल्पभूधारक शेतकरी आणि आदिवासींची 5 हजाराहून अधिक कुटुंबं सध्या गोराई गावात आहेत. या परिसरातील केवळ काही कुटुंबांकडे पाण्याच्या मीटरचे कनेक्शन आहे. तर अनेक आदिवासी वस्त्यांमध्ये मीटरचं कनेक्शनही नाही. तसं असलं तरीही या भागात आजपर्यंत पाणी आलेलं नसल्याचा दावा याचिकेतून केला गेला आहे. तर गोराई आणि मानोरीतील अन्य ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमध्ये कमी दाबानं पाणी येत असून गोराईतील रहिवाशांना दररोज संध्याकाळी फक्त एक तास पाणी पुरवठा होत असल्याचं याचिकेत नमूद केलेलं आहे.

गोराई किंवा कुळवेम गावामध्ये पाच सार्वजनिक विहिरी आहेत. परंतु, तेथील पाणी हे पिण्यायोग्य नसल्यानं त्यामुळे धोकादायक व गंभीर स्वरुपाचे आजार पसरण्याची भीती रहिवाशांना आहे. महिलांसह अनेक रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी दूषित पाण्यावरच अवलंबून रहावं लागत आहे. हायकोर्टानं साल 2023 मध्ये पालिका आयुक्तांना गोराईतून जाणाऱ्या पाईपलाइनमधील पाण्याचा दाब वाढवण्यासाठी सक्शन पंप बांधण्याची परवानगी दिली होती. मात्र, आजपर्यंत या जागेवर कोणतंंही बांधकाम झालं नसल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे. तसेच पाईपलाईनमार्फत पाण्याचे कनेक्शन असलेल्या दोन हजारांहून अधिक कुटुंबांना त्यांची बिले वेळेवर मिळतात. परंतु, पाणी काही मिळत नाही. त्यामुळे खासगी टँकरचे पाणी वाढीव दरानं विकत घ्यावे लागत असल्याचंही याचिकेत म्हटलेलं आहे.

गोराई रहिवाशांना पाण्याच्या गंभीर प्रश्नासाठी पालिका प्रशासनाचे अपयश आणि निष्क्रियता जबाबदार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला सक्शन पंप प्रकल्पाबाबत सविस्तर स्थिती अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देत तोपर्यंत पाण्याचे टँकर नियमित उपलब्ध करून देण्याचे आदेश हायकोर्टानं जारी केले आहेत.

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *