”वडिलांच्या निधनाने आयुष्यात अंधार…”; ‘तारक मेहता…’च्या अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame actor poet Shailesh Lodha Father Passes Away Actor Pens An Emotional Note Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :

[ad_1]

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता-कवी शैलेश लोढा यांचे वडील श्याम सिंह लोढा यांचे निधन झाले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

वडिलांच्या आठवणीत भावूक झाले शैलेश…

शैलेश लोढा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वडील श्याम सिंह लोढा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून एक छानसं स्माईल देताना दिसत आहे. हा फोटो शैलेश यांच्यासाठी खास असल्याचे म्हटले जाते. 

या फोटोसोबत शैलेशने अतिशय भावूक कॅप्शन लिहिले आहे. शैलेश यांनी म्हटले की, मी जो काही आहे, ती तुमची सावली म्हणून…आज सकाळी सूर्य उगवला,त्यामुळे सगळीकडे प्रकाश आला. मात्र, आमच्या आयुष्यात अंधार झाला. वडिलांनी देह त्यागला…अश्रूंची काही भाषा असती तर काही लिहू शकलो असतो. पुन्हा एकदा म्हणा ना, बबलू!

कलाकारांपासून ते चाहत्यांनी व्यक्त केला शोक…

शैलेश लोढा यांनी वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच, कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत दु:ख व्यक्त केले आहे. सगळेच त्याचे सांत्वन करत आहेत. ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने ‘ओम शांती… स्वत: ची काळजी घ्या’ असे म्हटले. 

वडिलांकडून मिळाली लेखनाची प्रेरणा…

शैलेश लोढा यांनी त्यांचे वडील श्याम सिंह लोढा यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि शिकून कविता लिहायला सुरुवात केली. शैलेश यांनी लिहिलेल्या ‘पिता से ही है जीवन और पिता से ही है जिंदगी’ या कवितेला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *