[ad_1]
The Vaccine War Trailer Out: दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द वॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. देशातील कोविड-19 च्या काळातील भारतीय शास्त्रज्ञांचा संघर्ष या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर द वॅक्सिन वॉर या चित्रपटाची चर्चा होत आहे.
नाना पाटेकर, गिरिजा ओक सप्तमी गौडा आणि पल्लवी जोशी हे कलाकार वॅक्सिन वॉर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. नाना पाटेकर शास्त्रज्ञांचे प्रमुख आहेत,असं ट्रेलरमध्ये दिसत आहे. शास्त्रज्ञांचे इमोशन्स द वॅक्सिन वॉर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये लसीवर काम करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांबात देखील दाखवण्यात आलं आहे.
ट्रेलरमध्ये अभिनेत्री रायमा सेन ही एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच अभिनेते अनुपम खेर यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
‘सुना मैंने, आपके साइंटिस्ट के पास एक लाख रुपये भी नहीं थे।’ हा नाना पाटेकर यांचा डायलॉग ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकू येतो. त्यानंतर पल्लवी जोशी म्हणतात, ‘मेरे नहीं सर, भारत के साइंटिस्ट।’
पाहा ट्रेलर:
विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करुन द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, ‘तुमच्या वॅक्सिन वॉर या चित्रपटाचा ट्रेलर सादर करत आहोत. चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी होणार रिलीज’
‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या मेकर्सच्या मते हा भारतातील पहिला बायो-सायन्स चित्रपट आहे.या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी या कलाकारांनी द कश्मीर फाइल्स या चित्रपटात काम केले होते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
.
[ad_2]
Source link