शनीची चाल बदलणार; पुढील 1 वर्षात ‘या’ 4 राशी होणार मालामाल, शनीच्या कृपेने सुख-समृद्धी वाढणार

[ad_1]

Shani 2024 : ज्योतिष शास्त्रात शनि (Shani) हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा शनि एखाद्यावर वाईट दृष्टी ठेवतो, तेव्हा तो एखाद्या राजासारख्या जीवन जगणाऱ्याला देखील भिकारी बनवू शकतो. शनीची साडेसाती, धैय्या आणि शनीच्या चालीतील बदलांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.

सध्या शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत असून 29 जून 2024 पासून शनि वक्री होणार आहे. शनीच्या उलट्या चालीचा मोठा परिणाम अनेक राशींवर पडू शकतो, तर काही राशींना शनीची चाल बदलल्याने वर्षभर खूप फायदा होईल, या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि त्यांच्या करिअरलाही चालना मिळेल. शनीची वक्री चाल नेमकी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) फलदायी ठरेल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल लाभदायक ठरेल. या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. तुमचा एखाद्या ठिकाणी अडकलेला पैसा देखील तुम्हाला मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

वृषभ रास (Taurus)

शनीच्या वक्री चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एतकी प्रगती मिळेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या काळात तुमची सर्व कामं यशस्वी होतील. तुमचा मान-सन्मान वाढेल. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक राहील.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांना शनीच्या उलट्या चालीचा फायदा होईल. तूळ राशीचा स्वामी शुक्र हा शनीचा मित्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना शनि विशेष लाभ देईल. या काळात तुमचा एखादा महत्त्वाचा व्यवसाय करार निश्चित होऊ शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी हा वेळ चांगला आहे.

धनु रास (Sagittarius)

शनीची उलटी चाल धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या जीवनात भरभराट येईल, तुमची संपत्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. शनीची चाल बदलल्यावर तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. नशिबाच्या साथीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील. तुमचं आरोग्य चांगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : तब्बल 55 वर्षांनंतर बनला शक्तिशाली चतुर्ग्रही योग; वृषभसह ‘या’ 3 राशींना मिळणार आर्थिक लाभाच्या संधी, करिअरमध्ये गाठाल अनोखी उंची

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *