[ad_1]
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच आता ठाकरे गट आणि मनसेने शिवाजी पार्कामध्ये (Shivaji Park) सभा घेण्याचं ठरवलं आहे. पण, शिवाजी पार्कातील सभेसाठी निवडणुकांच्या सभेसाठी ठाकरे गट विरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणते ठाकरे गट आणि मनसेकडून एकाच तारखेला सभा घेण्यासाठीचे अर्ज करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजो दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी अर्ज केला आहे. त्यामुळे आता प्रशासन कुणाला परवानगी देणार, यावर शिवाजी पार्कात कुणाचा आवाज घुमणार, हे ठरणार आहे.
शिवाजी पार्क मैदानावर आवाज कुणाचा?
17 मेला प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मेळावा यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघांचेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 17 मेला आपल्या पक्षाच्या प्रचार सभेसाठी मैदान मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांनी 18 मार्च रोजी एकाच दिवशी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र 17 मेला शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचं मुंबई महापालिकेने दिलेल्या इनवर्ड नंबर वरून दिसत आहे. त्यामुळे नियमानुसार शिवाजी पार्क मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळणार असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे.
इनवर्ड नंबर BMC चं काम सोपं करणार?
2016 च्या शासन निर्णयानुसार, विशिष्ट 39 दिवस वगळता इतर दिवशी शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी देण्याचा अधिकार हा नगर विकास विभागाला आहे. त्यामुळे नगर विकास विभाग आता या दोन अर्जांवर नेमका काय निर्णय घेतो आणि 17 मे रोजी कोणाला सभा शिवाजी पार्क मैदानावर करायला परवानगी मिळते, हे पहावे लागेल. याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी अशाच प्रकारे एका दिवशी सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेने अर्ज केला होता. मात्र त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिले अर्ज केला असल्यामुळे त्यांना सभेसाठी मैदान देण्यात आले होते.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link