[ad_1]
मुंबई : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची (Share Market) घसरणीसह सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी शेअर बाजार सुरु (Stock Market) होताच सेन्सेक्समध्ये (Sensex) 500 अंकांची घसरण झाली तर निफ्टी (Nifty 50) 100 अंकांनी खाली कोसळली. आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होताना दिसत आहे. परिणाम आजच्या सत्राच्या सुरुवातीला घसरण पाहायला मिळत आहे.
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात
आज भारतीय शेअर बाजाराची निराशाजनक सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. याशिवाय, इराण-इस्त्राईल युद्धाचा भारतीय रुपयावर परिणाम दिसून येत आहे. भारतीय रुपया नीचांकी पातळीवर उघडला, रुपया प्रति डॉलर 83.51 वर व्यवहार करत आहे. इतकंच नाही, तर कच्च्या तेलाचे भावही चढेच आहेत. कच्च्या तेलाचे दर 91 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.
.
[ad_2]
Source link