शेतकऱ्यांच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्याना मी सोडणार नाही; रविकांत तुपकर कडाडले, रोख नेमका कुणाकडे?

[ad_1]

Maharashtra Buldhana Updates : बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana District) समृद्धी महामार्गाच (Samruddhi Mahamarg) बांधकाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पात शेतजमिनी गेल्यात. याच शेतकऱ्यांच्या नावावर काही नेत्यांनी कोट्यावधी रुपये हडप केल्याचा आरोप शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे. या प्रस्थापितांशी माझी लढत असून यात मी जिंकणार असल्याचं तुपकर म्हणाले आहेत. मात्र, यामुळे पुन्हा समृद्धी महामार्ग चर्चेत आला असून ‘ते’ प्रस्थापित कोण? याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली : रविकांत तुपकर 

आपली लढत प्रतापराव जाधवांशी नसून प्रतापरावांची लढत आपल्याशी असल्याचं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं आहे. तर आपल्याला जनतेतून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, अशी टीका तुपकरांनी केली आहे.  

बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापराव जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे. परवा त्यांनी माझी लायकी काढली, आता त्यांची लायकी जनता काढणार आहे. मला मिळत असलेल्या जनतेतून प्रतिसादामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ज्यामुळे ते आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देतायेत. असा आरोप देखील तुपकर यांनी केला आहे. जाधवांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मोदींच्या चेहऱ्याची मदत न घेता माझ्यासारखं स्वतंत्र लढवून दाखवावं असं चॅलेंज देखील तुपकरांनी दिलं आहे. 

मी भाजपात जाणार ही केवळ अफवाच :  रविकांत तुपकर 

जनता हा आपला पक्ष, कुठेही तिकीट मागायला जावं लागलं नाही, गेल्या पाच वर्षांपासून आपण तयारी करतोय, त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार ही अफवा आहे, रविकांत तुपकरांचं वक्तव्य केलं आहे. 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *