सनातन धर्मावर वक्तव्य: उदयनिधी स्टॅलिन, ए राजांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; गुन्हा दाखल करण्

[ad_1]

नवी दिल्ली तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) आणि द्रमुक पक्षाचे खासदार ए. राजा (A. Raja) यांच्याविरोधात गुरुवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला (Santan Dharm) संपवण्याचे वक्तव्य केले होते. मात्र, तामिळनाडू पोलिसांनी (Tamilnadu Police) त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली असल्याचे याचिकाकर्ते विनित जिंदल यांनी सांगितले. 

याचिकाकर्ते जिंदल यांनी म्हटले की, या प्रकरणात दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यांनीदेखील एफआयआर दाखल केली नाही. सुप्रीम कोर्टाने सगळ्या राज्यांच्या पोलिसांना द्वेषयुक्त भाषण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उदयनिधी स्टॅलिनविरोधात गुन्हा दाखल न केल्याने तामिळनाडू आणि दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला असल्याचा दावा जिंदल यांनी केला. 

या याचिकेत उदयनिधी स्टॅलिन यांच्याशिवाय द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या वक्तव्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राजा यांनी काय म्हटले?

द्रमुक नेते ए. राजा म्हणाले की, सनातन धर्माची एड्सशी तुलना केली पाहिजे, ज्याला सामाजिक कलंक आहे. ते म्हणाले, उदयनिधी स्टॅलिन यांनी डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून नम्रता दाखवली आहे.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नई येथे तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता.  त्यावेळी त्यांनी सनातन धर्मातील जाती भेद आणि इतर प्रथांवर टीका केली. त्यांनी धर्माची  तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. सनातन धर्मामुळे समाजात भेदभाव होत असल्याचे ते म्हणाले होते.

उदयनिधी यांनी वाढत्या वादावर काय म्हटले?

सनातन धर्मावरील या टिप्पणीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांनीही स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले होते, “मी कधीही सनातन धर्माच्या अनुयायांच्या नरसंहाराची हाक दिलेली नाही. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली आहे आणि विषमता, माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारणारा सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे, असं मी वारंवार सांगेन. भाजपचे काम खोट्या बातम्या पसरवणं आहे. आणि ती माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे.”

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *