सरकारला दिली ४६४ रु. ची भीक, शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर

शिर्डी  – शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सुरू केलेल्या ‘देता का जाता’ आंदोलनादरम्यान गुरुवारी पुणतांब्याच्या शेतकºयांनी सरकारसाठी झोळीत भीक मागितली. यामध्ये जमा झालेले ४६४ रुपये मनीआॅर्डरद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविले. चौथ्या दिवशी अन्नत्याग करणाºया शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली आहे. आंदोलन मागे घ्यावे यासाठी शिष्टाई करण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे पुणतांब्यात दाखल झाले आहेत.

शेतीमालाला हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी करावी यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सरकारच्या निषेधार्थ रथयात्रा काढली आहे. त्यास पाठिंबा देत पुणतांबा येथील निकिता जाधव, शुभांगी जाधव, पूनम जाधव या कृषिकन्यांसह काही महिलांनी ४ दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. चौथ्या दिवशी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी केली.


आंदोलनादरम्यान शुभांगी जाधव हिची रक्तातील साखर कमी होऊन प्रकृती ढासळल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने प्रशासनास कळविले. राहात्याचे तहसीलदार माणिक आहेर व पोलीस निरीक्षक परदेशी यांनी भेट देऊन जाधव हिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र मागण्या मान्य होऊन आंदोलनाला यश मिळत नाही, तोवर तिने उपचारांस नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *