सागर मुक्ताच्या पाठिशी उभा राहणार, सावनीचा डाव उलटा पडणार?

सागर मुक्ताच्या पाठिशी उभा राहणार, सावनीचा डाव उलटा पडणार?

[ad_1]

Premachi Goshta Latest Episode :  सागरच्या कंपनीची नवी मॉडेल म्हणून मुक्ताला निवडण्यात आले. त्यामुळे सावनीचा चांगलाच जळफळाट सुरू आहे. मुक्ता-सागरला मात देण्यासाठी पुन्हा एकदा हर्षवर्धनच्या कानमंत्राचा वापर करते. सावनी आता नेमकं काय करणार, मुक्ताची कोंडी होणार का, सावनीचे चॅलेंज मुक्ता घेणार का, हे ‘प्रेमाची गोष्ट’  (Premachi Goshta) मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. 

आजच्या एपिसोडमध्ये काय पाहाल?

सईच्या हट्टामुळे सागर रात्री झोपताना गोष्ट सांगतो. ही गोष्ट आदित्य आणि त्याची असते. सागर या गोष्टीत आपला भूतकाळ सांगत असतो. मुक्ता ही गोष्ट ऐकून चिंतेत पडते. सागर ही गोष्ट सांगताना भावूक होतो. सागर आदित्यसोबतच्या जुन्या गोष्टीत रमतो. गोष्ट ऐकणारी सई ही माझा एंजल तुच आहेस असे म्हणते. सई झोपल्यावर मुक्ता सागरला गोष्टीतला मुलगा आदित्य होता ना असे विचारते, त्यावर सागर काहीच बोलत नाही. तर, दुसरीकडे मुक्ताने मॉडेलिंगचा निर्णय घेतल्याने  सावनी चिंतेने विचारत असते. रात्रीच्या वेळी आदित्य तिच्याकडे येतो तेव्हा ती त्याच्यावर ओरडते. 

सावनीचे टाकला नवा डाव 

आजच्या भागात, सागरच्या कंपनीत संचालक मंडळाचे सदस्यांच्या उपस्थित नव्या मॉडेलचा कॉच्युम ठरवण्याची तयारी असते. त्याचवेळी सावनीची एन्ट्री होते.  सागर आणि तिच्यात शाब्दिक वाद होतो. सावनी मुक्ताच्या नावाला विरोध करते. सावनी इतर बोर्डच्या सदस्यांचे मत आपल्या बाजूने वळवते. सागर हा अल्पमतात असल्याचे सावनी सांगते. त्यानंतर  मॉडेल कोण होणार हे यासाठी स्पर्धा घ्या आणि मुक्ताने माझ्यापेक्षा चांगली उमेदवार आहे हे तिने सिद्ध करून दाखवावे असे सावनी सांगते. स्पर्धा हरली तर मुक्ताने या ऑफिसमध्ये पाऊलही ठेवू नये असे सावनी म्हणते. सावनीचे चँलेज सागर मुक्ताच्यावतीने स्वीकारतो. मुक्तासोबत तिचा नवरा आहे,  त्यामुळे ती घाबरण्याचा प्रश्नच नाही असे सागर सावनीला ठणकावतो. 

पाहा व्हिडीओ: Premachi Goshta | Latest Episode 169 |

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *