सात सिनेइंडस्ट्रीजमध्ये सुपरस्टार, रोमँटिक हिरो ते खलनायक म्हणून बॉलिवूडमध्ये छाप, महाराष्ट्रासोबत खास नातं; या अभिनेत्याला ओळखलं का?

[ad_1]

R. Madhavan Latest News :  काही कलाकार हे  आपआपल्या सिनेसृष्टीत स्टार असतात. काहींचा प्रभाव हा आणखी एखाद्या सिनेसृष्टीवर असतो. फोटोत दिसणाऱ्या या मुलाने एक, दोन नव्हे तर सात सिनेइंडस्ट्रीमध्ये आपल्या कामाचा डंका वाजवला आहे. त्यामुळे हा कलाकार पॅन इंडिया स्टारदेखील आहे. बॉलिवूडमध्ये रोमँटिक हिरो म्हणून पदार्पण केले असले तरी सध्या खलनायकी भूमिकेने लोकांची मने जिंकली आहेत. हा अभिनेता म्हणजे आर. माधवन (R. Madhavan). 

सात भाषांमधील सिनेइंडस्ट्री  गाजवली

आर. माधवनने दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘रहना है तेरे दिल मे’ या चित्रपटातून आर. माधवनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये माधवनने वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात वैविध्य असणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. थ्री इडियट्समध्ये त्याने विनोदी धाटणीची भूमिका साकारली होती. तर, विक्रम वेधा सारख्या चित्रपटात तो अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसला होता. त्याशिवाय, माधवनने हिंदीसह तमिळ,कन्नड, इंग्रजी, तेलगू, मल्याळम, मलय आदी भाषेतही आपली छाप सोडली आहे.  

छोट्या पडद्यावरील मालिकांपासून सुरुवात…

माधवनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली. बनेगी बात अपनी, घर जमाई, साया, आरोहन, सी हॉक्स आदी मालिकांमध्ये आर. माधवनने काम केले. त्यानंतर सुधीर मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या’इस रात की सुबह नही’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली. 

कोल्हापूरसोबत खास नातं

आर माधवननं एबीपी माझा कट्टावर  सांगितलं होतं की, सुरुवातीचा काही काळ त्यांनी कॅनडामध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर भारतात परत आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यास सांगितलं. शिक्षणाबाबतची आठवण सांगताना आर. माधवन म्हणाला, “कोल्हापूरमधील दिवस हे माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. कोल्हापूरला येण्याच्या आधी मी कॅनडामध्ये होतो. त्यानंतर मी भारतात इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यास आलो. सुरुवातीला माझ्या वडिलांनी सांगितलं की पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज हे खूप चांगलं कॉलेज आहे. त्यामुळे मी आणि माझे वडील कॉलेजची चौकशी करण्यासाठी पुण्याला गेलो. पण नंतर आम्ही दुसरं कॉलेज निवडण्याचा निर्णय घेतला. एका नातेवाईकांनी आम्हाला कोल्हापूरच्या कॉलेजबाबत सांगितलं. नंतर मी कोल्हपूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. माझी बायको देखील कोल्हापूरचीच आहे.” कोल्हापूरमध्ये असताना मित्रांनी केलेल्या मदतीबाबत देखील आर. माधवननं यावेळी सांगितलं. ‘त्यावेळी माझे मित्र मला त्यांची बाईक चालवायला देत होते. कॉलेजमध्ये आम्ही खूप धम्माल करत होतो.’ असंही माधवनने ‘माझा कट्टा’वर म्हटले. 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *