हृतिकचा ‘Fighter’ ते ‘ऐ वतन मेरे वतन’; मार्च महिन्याच्या ‘या’ आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी

हृतिकचा 'Fighter' ते 'ऐ वतन मेरे वतन'; मार्च महिन्याच्या 'या' आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी

[ad_1]

OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. मार्च महिन्याचा हा आठवडा ओटीटी प्रेमींसाठी खूपच खास असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांना 18 ते 24 मार्च दरम्यान ओटीटीवर अनेक चांगल्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत. सिनेमागृहात धमाका केलेल्या सिनेमांसह अनेक नवे सिनेमेदेखील या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होतील.

ऐ वतन मेरे वतन (Ae Watan Mere Watan) 
कधी रिलीज होणार? 21 मार्च
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ

‘ऐ वतन मेरे वतन’ हा सिनेमा येत्या 21 मार्च 2024 रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात सारा अली खान (Sara Ali Khan) उषा मेहता (Usha Mehta) यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. उषा मेहता यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 1942 मध्ये भारतात पहिलं अंडरग्राऊंड रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं. ‘ऐ वतन मेरे वतन’ या सिनेमात सारा अली खान आणि इमरान हाशमी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

फायटर (Fighter)
कधी रिलीज होणार? 21 मार्च
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

‘फायटर’ हा 2024 वर्षातला पहिला सुपरहिट सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अभिनीत हा सिनेमा प्रेक्षकांना 21 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 199.45 कोटींची कमाई केली होती.

अब्राहम ओजलर (Abraham Ozler)
कधी रिलीज होणार? 20 मार्च
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार

जयाराम आणि ममूटी यांचा ‘अब्राहम ओजलर’ हा मल्याळम सिनेमा या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 20 मार्च 2024 रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. ‘अब्राहम ओजलर’ हा एक इन्वेस्टिगेटिव्ह थ्रिलर सिनेमा आहे. 

मर्डर मुबारक (Murder Mubarak)
कधी रिलीज होणार? 15 मार्च
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, सारा अली खान आणि विजय वर्मा यांचा ‘मर्डर मुबारक’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा थरार नाट्य असणारा चित्रपट आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारली आहे. 

लाल सलाम (Lal Salaam)
कधी रिलीज होणार? 22 मार्च
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘लाल सलाम’ हा सिनेमा 9 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता 22 मार्चला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *