12th August Headline Today Headlines Pune Chandni Chowk Inauguration Nitin Gadkari Congress Maharashtra Politics

[ad_1]

12th August Headline : आज राज्यात दिवसभरात विविध घडामोडी घडणार आहेत. पुण्यातील चांदणी चौकाचे लोकार्पण आज करण्यात येणार आहे. चांदणी चौकातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नवीन प्रकल्प उभा करणे आवश्यक होते. त्यासाठी जुना पुल 1 ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. आता चांदणी चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे. तर, भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही लोकसभेसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. 

पुण्यातील चांदणी चौकाचे लोकार्पण

पुणे – पुण्यातील चांदणी चौकाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पुण्यातुन जाणाऱ्या पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आलाय. चांदणी चौकातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नवीन प्रकल्प उभा करणे आवश्यक होते. त्यासाठी जुना पुल 1 ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. आता चांदणी चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या नव्या प्रकल्पामुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र,  त्यासाठी छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव आणि फोटो वापरण्यात आलेले नाहीत.  यावरुन मेधा कुलकर्णी नाराज झाल्यात.  हा आपले अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न असल्याचे सोशल मीडियावर त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांची श्रद्धांजली सभा

मुंबई – ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचे दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मुंबई एज्युकेशन ट्रस्ट, भुजबळ नॉलेज सिटी, वांद्रे येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोक सभेस सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, कला आदी क्षेत्र यासह सर्वपक्षीय राजकीय मान्यवर श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
 

काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांची पत्रकार परिषद

दिल्ली – काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांची काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभेत पंतप्रधान मोदी यांच्यावर टिप्पणी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत संसदेतून दोन दिवस निलंबित करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची शक्यता आहे. 
 

राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठका

अमरावती –  अमरावती लोकसभा क्षेत्रातील विधानसभा निहाय चर्चा करण्याकरिता आणि होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी कॉग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटी भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

चंद्रपूर –  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्यात होणार दाखल होणार आहे. सावली येथे दुपारी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना  – येथे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची बैठक होणार असून यावेळी जालना लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय बैठकीचे सकाळी आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर – पृथ्वीराज चव्हाण हे दोन दिवस हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघांचा दौरा करून आढावा घेणार आहेत.  हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी निवडणूक लढवत आलेत.

पुण्यात ‘संभाजी ब्रिगेड कॉनक्लेव्ह’चे आयोजन 

पुणे – ‘संभाजी ब्रिगेड कॉनक्लेव्ह’चे प्रवीण गायकवाड यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात दुपारी रोहित पवार आणि त्यानंतर संध्याकाळी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. 
 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *