25 Acres Agriculture Under Water Due To Back Water Of Mama Lake In Bhandara

[ad_1]

Agriculture News : भंडारा (bhandara)  जिल्ह्यातील मामा तलावाच्या (Mama lake) बॅकवॉटरमुळं काही शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. लाखांदूर तालुक्यातील चिकना गावातील 25 एकर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळं खरीप हंगामात केलेली भात पिकाची लागवड पाण्याखाली आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून, त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळ याविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या साकोली विभागाअंतर्गत येणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील चिकना गावातील 25 एकर शेती मामा तलावाच्या बॅकवॉटरमुळं पाण्याखाली आली आहे. यामुळं खरीप हंगामात केलेली भात पिकाची लागवड पाण्याखाली आली आहे. दोन वर्षांपूर्वी चिकना गावातील मामा तलावाची देखभाल दुरुस्ती साकोली येथील उपविभागाच्या लघु पाटबंधारे विभागानं केली होती. मात्र, ते सर्व काम नियोजनपूर्ण नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी करुन त्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडं दुर्लक्ष केलं. आता मात्र, शेती पाण्याखाली आली आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. काल दिवसभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या तीन चार दिवसापासून भंडारा जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. गेल्या काही दिवसात जिह्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. आता पुन्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.  

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता

मागील तीन ते चार दिवसापासून भंडारा जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर कालपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसात जिह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. परिणामी गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आली होती. पाऊस कमी झाल्यानं कालपर्यंत 31 गेट बंद करुन केवळ दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, काल सुरू झालेला हा पाऊस पाच तासाच्या विश्रांतीनंतर रात्री पुन्हा सुरू झाला. यामुळं नदी नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, नदी नाले दुथडी भरुन लागले वाहू

[ad_2]

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *