36 गर्लफ्रेंड, 72 एक्स आणि 80 मित्रांसोबत ‘Jawan’ पाहणार शाहरुखचा चाहता!

36 गर्लफ्रेंड, 72 एक्स आणि 80 मित्रांसोबत 'Jawan' पाहणार शाहरुखचा चाहता!

[ad_1]

Shah Rukh Khan Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘जवान’ (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली असून रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे. आता किंग खानच्या एका वेड्या चाहत्याने संपूर्ण थिएटरचं बूक केलं आहे. चाहत्याने स्वत: ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

‘जवान’च्या रिलीजआधी किंग खानने ‘आस्क एसआरके’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी अनेक चाहत्यांनी त्याला ‘जवान’ सिनेमासंदर्भात प्रश्न विचारली आणि सिनेमासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं. शाहरुखच्या एका चाहत्याने तर संपूर्ण थिएटर बुक केलं आहे. चाहत्याने स्वत: ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. चाहत्याने त्याचा एक फोटो सोशल ट्वीट करत लिहिलं आहे,”मी माझ्या 36 गर्लफ्रेंड, 72 एक्स-गर्लफ्रेंड्स आणि 80 मित्रांसोबत ‘जवान’ हा सिनेमा पाहणार आहे…संपूर्ण थिएटर बुक केलेलं आहे”. त्याने त्याची ही पोस्ट किंग खानला टॅग केली आहे. 

चाहते सुपरहिट करणार ‘जवान’

शाहरुखने त्याच्या मोठ्या चाहत्याची पोस्ट पाहिली असून त्याने रिपोस्ट करत लिहिलं आहे,”व्हा भावा…तू तरुणपण चांगलच चमकत आहे..मज्जा कर”. अनेक नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनीही या ट्वीटवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं आहे,”सिनेमागृहात धमाका होणार आहे.. 36 गर्लफ्रेंड जेव्हा ‘जवान’ सिनेमा पाहायला एकत्र येतील तेव्हा त्यांच्यात भांडणच होतील..आणि सिनेमा पाहायचं त्या विसरुन जातील”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,”खरा ‘जवान’ तर हा मनुष्य आहे.. भाऊ ‘जवान’ सिनेमा हिट करुनच राहील”. 

 शाहरुख खानचा ‘जवान’ हा बहुचर्चित सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पुन्हा एकदा किंग खानचा अॅक्शन मोड पाहण्यास चाहते उत्सुक आहे. ‘जवान’ या सिनेमात शाहरुखचे सहा लूक पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे अॅक्शनचा तडका असणाऱ्या या सिनेमात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘जवान’ या सिनेमाने आतापर्यंत 2,46,000 तिकीटांची विक्री केली आहे. ‘जवान’ या सिनेमात शाहरुखसह नयनतारा (Nayanthara), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) झलकही या सिनेमात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *