69 National Film Awards Ekda Kaay Zala Marathi Movie Win Best Marathi Movie Award

69 National Film Awards Ekda Kaay Zala Marathi Movie Win Best Marathi Movie Award

[ad_1]

Ekda Kaay Zala: गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट मांडणाऱ्या ‘एकदा काय झालं’ (Ekda Kaay Zala)  या चित्रपटानं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. ‘एकदा काय झालं हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  जाहीर झाल्यानंतर ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचा दिग्दर्शक सलील कुलकर्णीनं (Saleel Kulkarni)   एक खास पोस्ट शेअर करुन त्याची भावना व्यक्त केली आहे.

सलील कुलकर्णी यांची पोस्ट

सलील कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, ‘500 ची नोट ते नॅशनल अवॉर्ड! तर, एकदा काय झालं… मी एका चित्रपट सोहळ्यात एक सुंदर चित्रपट बघितला एखाद्या चित्रपटाच्या आशयात इतकी ताकद असावी की, थेट त्याने आपल्या डोळ्यातूनच पाणी काढावं… तर झालं असं, माझा मित्र सलील कुलकर्णी चा “एकदा काय झालं”हा चित्रपट मी पाहिला, बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रे या गुणी मुलाने इतकं कौतुकास्पद काम केलं, की मी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आणि त्याच्या हातात 500 ची नोट देत म्हणलं, हा सिनेमा भारीच आहे पण तूही खूप पुढे जाशील! आणि आज ही राष्ट्रीय पुरस्काराची बातमी बघून अतिशय आनंद होतोय!’

‘सुरूवातीला सलील ‘एकदा काय झालं’ हा त्याचा चित्रपट घेऊन रिलीजसाठी अनेक निर्माते आणि कॉर्पोरेट हाऊसेसडे गेला, मात्र काही कारणाने पुढे काही झालंच नाही, पण उत्तम आशय बघून माझ्या एका शब्दावर माझ्या दुसऱ्या मित्राने, हेमंत गुजराथीने या चित्रपटाच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं. आज आनंद याचा वाटतोय की, एका मित्राचे दिग्दर्शन, दुसऱ्या मित्राची प्रस्तुती आणि माझा व माझ्या टीम चा मार्केटिंग पीआर आणि सोशल मीडियाचा खारीच्या वाटा असलेल्या आपल्या सिनेमाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले.”एकदा काय झालं” च्या संपूर्ण टीमचं भरभरून कौतुक आणि सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!’

एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमामध्ये  एकदा काय झालं या चित्रपटामधील अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) आणि सलील कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी  सलीलनं सांगितलं होतं, फिल्ममेकिंग करणं हे अवघड काम आहे. मी संगीतकार म्हणून काम करत होतो. मी विविध कार्यक्रमांचे परीक्षण करत असताना कॅमेरा अँगल्स आणि इतर गोष्टींचे निरीक्षण करत होतो. जेव्हा मी ‘एकदा काय झालं’ या सिनेमाच्या निर्मितीचा विचार करत होतो तेव्हा मला या चित्रपटातील गोष्टी सांगाणारा माणूस हा सुमीत राघवन साकारु शकतो असं वाटलं’

वाचा इतर बातम्या: 

Majha Katta : ‘एकदा काय झालं’; सलील कुलकर्णी, सुमीत राघवन सांगणार गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *