80-90 चं दशक गाजवणारी दिग्गज अभिनेत्री, ‘त्या’ एका अफवेमुळे करिअर झालेलं बरबाद

80-90 चं दशक गाजवणारी दिग्गज अभिनेत्री, 'त्या' एका अफवेमुळे करिअर झालेलं बरबाद

[ad_1]

Aruna Irani Career : अरुणा इराणी (Aruna Irani) या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहेत. 70-80 च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अरुणा इराणी यांनी चाहत्यांना वेड लावलं. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत अरुणा इराणी यांनी काम केलं आहे. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा त्या भाग होत्या. सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या अरुणा इराणी यांचं एका अफवेमुळे करिअर संपुष्टात आलं होतं. अरुणा इराणी या हिंदी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री होत्या. 90 च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. व्यावसायिक करिअर यशाचा शिखर गाठत असताना वैयक्तिक आयुष्यातील एका गोष्टीने मात्र त्यांना हैराण केलं.

अरुणा इराणी यांचं करिअर टॉपवर असताना त्यांचं नाव विनोदवीर महमूदसोबत (Mehmood) जोडलं गेलं. या अफवेमुळे अभिनेत्यासोबतचं तिचं नातं तुटलं आणि करिअरचा उतरता प्रवास सुरू झाला. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं होतं. अभिनेत्याला तिने तिचा गुरू मानला होता आणि ते फक्त एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं तिने सांगितलं.

महमूदसोबत अफेअरच्या चर्चा

झूमला दिलेल्या मुलाखतीत अरुणा इराणी म्हणाल्या,”मी आणि महमूद आम्ही एकत्र आजवर अनेक चित्रपटांत काम केलं आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. त्यावेळी मुमताज हीरोइन झाली आणि शुभा खोटे यांनी लग्न केलं. निर्मात्यांनी त्याच्याविरोधात काम करण्यासाठी काही अभिनेत्रींची निवड केली यात माझा समावेश होता. खरंतर महमूद यांनी मला विनोदाचा टायमिंग शिकवला आहे”. 

अफवांमध्ये करिअर बर्बाद

अरुणा इराणी यांनी खुलासा केला की,”महमूदसोबतच्या लग्नाच्या अफवांमुळे मला काम मिळणं बंद झालं होतं. माझे ‘कारवां’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ हे दोन्ही चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाले होते. दोन्ही सिनेमांचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटानंतर मला काम मिळणं बंद झालं. मी महमूदसोबत लग्न केल्याची अफवा पसरली होती. पण खरंतर असं काही नव्हतं. त्यावेळी आम्ही मीडियाला बोलावून गोष्टी सांगायला हव्या होत्या. पण या अफवेमुळे इंडस्ट्रीने मला दूर केलं. मला मुख्य नायिका म्हणून काम मिळणं बंद होत गेलं”. 

अरुणा इराणी यांचा सिनेप्रवास (Aruna Irani Movies)

अरुणा इराणी यांनी 1958 मध्ये आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात केली. ‘शिकवा’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. गोल्डन इराच्या अनेक हिट चित्रपटांत त्या दिसून आल्या आहेत. अरुणा इराणी 1990 मध्ये सिने-दिग्दर्शक कुकू कोहली यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या. कुकू कोहली यांच्या अरुणा इराणी दुसऱ्या पत्नी आहेत.

संबंधित बातम्या

Aruna Irani :  लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करणं सोपं नसतं, अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितला अनुभव

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *