छोट्या पडद्यावरील नायिका दिसणार बिग बॉस 18 मध्ये? अभिनेत्रीने मेकर्ससमोर ठेवली ‘ही’ अट

छोट्या पडद्यावरील नायिका दिसणार बिग बॉस 18 मध्ये? अभिनेत्रीने मेकर्ससमोर ठेवली 'ही' अट

[ad_1]

Bigg Boss 18 contestant : सध्या सगळीकडेच बिग बॉस 18 (Bigg Boss 18) ची चर्चा सुरु आहे. नुकताच बिग बॉस 17 हा सिजन पार पडला. या सिजनमध्ये मुन्नवर फारुकीने (Munnawar Faruqui) ट्रॉफीवर मोहोर उमटवली. त्यामुळे आता प्रेक्षकांना बिग बॉस 18 ची प्रतिक्षा लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वी या शोमधल्या पहिल्या स्पर्धकाविषयी माहिती समोर आली होती.  डिजिटल कंटेंट क्रिएटर पूजा शर्मा रेखाने बिग बॉस 18 मध्ये जाण्यासाठी संपर्क साधला असल्याची माहिती सध्या समोर आली  होती. 

असं असताना छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.पण या अभिनेत्रीने मेकर्ससमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे जर मेकर्सनी तिच्या या अटी मान्य केल्या तर ही अभिनेत्री बिग बॉस 18 च्या घरात पाहायला मिळू शकते. 

ही अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात?

‘कुंडली भाग्य’ ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे  आहे. या मालिकेतून प्रीताच्या भूमिकेतून अभिनेत्री श्रद्धा आर्य प्रेक्षकांच्या भेटीला आली. मागील अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर तिची जादू दाखवत आहे. या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. दरम्यान श्रद्धा आता बिग बॉसच्या घरातही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अभिनेत्रीने ठेवली ही अट?

मात्र, श्रद्धा आर्यने बिग बॉस 18 मध्ये जाण्यासाठी निर्मात्यांसमोर एक अट ठेवली आहे. नुकतीच या अभिनेत्रीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी तिला ‘बिग बॉस 18’ किंवा ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये जाण्याबद्दल विचारले. तेव्हा तिनं म्हटलं की, जर ती या शोमध्ये सहभागी झाली तर तिला तिची ऑन-स्क्रीन बहीण अंजुमसोबत जायला आवडेल.

एकता कपूरच्या कुंडली भाग्य या शोमध्ये अंजुमने श्रद्धाच्या ऑन-स्क्रीन बहिणीची भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी अंजुमने शो सोडला होता, तर श्रद्धा अजूनही शोमध्ये प्रीताची भूमिका करत आहे. दोन्ही अभिनेत्री ऑफ-स्क्रीन देखील एकमेकींच्या फार जवळ आहेत. 

ही बातमी वाचा : 

Jitendra Kumar : ‘तुम्हाला अशाच कारणांमुळे प्रेम होतं…’, पंचायतमधल्या सचिवजींनी शेअर केली खऱ्या आयुष्यातल्या रिंकीची स्टोरी

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *