प्रेम जुळलं, लग्नाची बोलणाही झाली, पण मुलीच्या आईनंच दिला नकार; म्हणूनच अक्षय खन्नाला नाही होता आलं कपूरांचा जावई

प्रेम जुळलं, लग्नाची बोलणाही झाली, पण मुलीच्या आईनंच दिला नकार; म्हणूनच अक्षय खन्नाला नाही होता आलं कपूरांचा जावई

[ad_1]

Akshaye Khanna Birthday  : बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये अक्षय खन्नाचा (Akshaye Khanna) देखील समावेश आहे. त्याच्या अभिनयाच्या जोरवर आजवर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. आज अक्षय त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करतोय. अक्षय जितका त्याच्या कामामुळे चर्चेत आला तितकाच तो त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला. अभिनेता किंवा अभिनेत्रींच्या अफेअरच्या चर्चा होणं ही काही इंडस्ट्रीत नवीन गोष्ट नाही. कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीचं नाव कोणाबरोबर तरी जोडलं जातंच. अक्षयच्या सुरुवातीच्या काळातच करिश्मासोबत (Karisma Kapoor) त्याचं अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. 

अक्षय आणि करिश्माच्या नातं हे लग्नापर्यंत देखील पोहचलं होतं. पण करिश्माची आई बबिता यांनी ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याने हे लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर मात्र अक्षयने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. करिश्मासोबतचं नात तुटल्यानंतर अक्षयने अद्यापही लग्न केलेलं नाही. बॉर्डर या सिनेमातून अक्षयने त्याच्या अभिनयाची छाप सोडली. याच सिनेमामुळे त्याला खरी प्रसिद्धीही मिळाली. याच सिनेमासाठी त्याला पुरस्कार देखील मिळाला होता. 

करिश्मा आणि अक्षयचं लग्न का मोडलं?

करिश्मा आणि अक्षयच्या जोडीची बरीच चर्चा झाली. करिश्मासोबत लग्न करण्याचा अक्षय निर्णय घेतला आणि तिच त्याची इच्छा देखील होती. त्यामुळे रणधीर कपूर आणि विनोद खन्ना यांनी त्या दोघांच्या लग्नाची बोलणी देखील केली. पण ऐनवेळी करिश्माची आई बबिता यांनी लग्नाला नकार दिला. त्यावेळी करिश्माच्या तुलनेत अक्षयचं करिअर फारसं नाही, असं कारण देत त्यांनी हे लग्न मोडलं होतं. त्यानंतर अक्षयने मात्र कोणाशीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 

सध्या अक्षय काय करतो?

सध्या अक्षय फार कमी चित्रपट, सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. तो शेवटाचा दृश्यम -2 या सिनेमात दिसला होता. त्यानंतर तो आता एका वेबसरिजमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कोणत्या आगामी प्रोजेक्टमधून अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता सध्या चाहत्यांना लागून राहिली आहे.  

ही बातमी वाचा :

Shiv Thakare : Bigg Boss मराठी 2च्या विजेतेपदावर नाव कोरलं, 25 लाख रुपये बक्षीस मिळालं खरं, पण…; शिव ठाकरेने केला मोठा खुलासा

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *