Child Health : मुलांना मोमोज, पिझ्झा, बर्गर, नूडल्स देताय? जरा थांबा, ही बातमी वाचा.. 250 मुलांवर केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासा!

[ad_1]

Child Health : बरेच पालक आपल्या लहान मुलांना त्यांच्या आवडीपोटी फास्ट फूड, जंक फूड खायला देतात. पण तुम्हाला माहित आहे का मोमोज, पिझ्झा, बर्गर, नूडल्स सारखे पदार्थ तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी किती घातक आहेत? जवळपास 250 मुलांवर संशोधन करण्यात आले, ज्यात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. फास्ट फूडचे अतिसेवन आणि बदलती जीवनशैली मुलांसाठी घातक असल्याचे आढळून आलंय. होय हे खरंय.. ही बातमी एकदा वाचाच…

लहान मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सरचा धोका

250 मुलांवर केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे. जास्त फास्ट फूड खाल्ल्याने मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होऊ शकतो.पबमेडमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात या दोन्ही आजारांसाठी फास्ट फूडला जबाबदार धरण्यात आलंय. मुलांच्या खाण्याच्या सवयींवर करण्यात आलेल्या या संशोधनानुसार मोमोज, पॅकबंद स्नॅक्स, पिझ्झा, कोल्ड ड्रिंक्स, नूडल्स, मंचुरियन हे पदार्थ मुलांच्या शरीराला पोकळ करत आहेत. अतिसेवनामुळे कुपोषण वाढत आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थांचे अतिसेवन कर्करोगाचे कारण बनत आहे.

टाईप-टू मधुमेहाचा धोका 

फास्ट फूडमध्ये जास्त प्रमाणात मीठ, साखर आणि ट्रान्सफॅट असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्टोन आणि टाईप-टू मधुमेहाचा धोका वाढत आहे. हमीदिया हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ. अमित जैन सांगतात की, दगडांचा त्रास असलेल्या मुलांमध्येही पौष्टिकतेची कमतरता दिसून येते. फास्ट फूड हे देखील यामागचे प्रमुख कारण आहे. मुलांच्या वाढीसाठी योग्य आहार आणि खेळ आवश्यक आहेत.

तब्बल 250 मुलांवर संशोधन

पीजीआय लखनऊमध्ये 250 मुलांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये फास्ट फूडचे अतिसेवन आणि आरामदायी जीवनशैली मुलांसाठी घातक असल्याचे दिसून आले. मुलांच्या या खाण्याच्या सवयीमुळे शरीरातील खराब चरबी वाढत आहे आणि त्यामुळे दगडांची समस्याही निर्माण होत आहे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

बालरोगतज्ञ डॉ. राजेश टिक्कास यांनी मुलांसाठी क्रीडा उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच पौष्टिक आहार त्यांच्या वाढीस उपयुक्त ठरतो. फास्ट फूडमुळे कुपोषण आणि पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते.

– जास्त थकवा आणि अस्वस्थता
– पाठ आणि पोटात दुखणे, विशेषतः पाठीच्या खालच्या भागात
– लघवी करताना वेदना
– उलटीची समस्या

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>

Travel : शिमला, मनाली, डलहौसी विसराल! जेव्हा एप्रिलमध्ये यापेक्षाही ‘भारी’ हिल स्टेशनला भेट द्याल

 

 

 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *