Adipurush To Made In Heaven Season 2 These Films And Web Series From Will Be Released On Ott In August

[ad_1]

August OTT Release ओटीटीवर नवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. या वेब सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्यामध्ये ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल…

मेड इन हेवन-2 (Made In Heaven Season 2)

‘मेड इन हेवन 2’ या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  11 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone)

हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone) या चित्रपटातून अभिनेत्री आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला Netflix वर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलियासोबत गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आदिपुरुष (Adipurush)

प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 1 ऑगस्टला ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटमध्ये जाऊन पाहिला नाही त्यांना आता हा चित्रपट  प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या बघता येणार आहे.

‘गन्स अँड गुलाब’ (Guns And Gulab)

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावची ‘गन्स अँड गुलाब’ ही सीरिज लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. ही सीरिज तुम्ही 18 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

वाचा



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *