नागपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त

[ad_1]

Nagpur Airport : नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) कस्टम्स (सीमा शुल्क ) विभागाकडून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.  या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे 8 कोटी 81 लाख रुपयांचे 2 किलो 937 ग्रॅम methaqualone  हे अमली पदार्थ (ड्रग्स) जप्त केले आहे. पुण्यानंतर आणखी एका शहरात मोठा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय. 

नागपुरातील सर्वात मोठी कारवाई 

अमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही नागपुरातील सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणातील तस्कर तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील रहिवासी आहे. ४५ वर्षीय इसम युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेजची फ्लाइट क्र QR-590 ने आज पहाटे नागपूर विमानतळावर आला. कस्टम अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे आधीच सापळा रचलेला होता. यातून ड्रग्स सीमा शुल्क विभागाच्या हाती लागले आहे. 

संशय आल्याने आरोपीची झडती

नागपूरच्या methaqualone ड्रग्स प्रकरणातील आरोपी हा ग्रीन चॅनलवरून जात असताना त्याला अडवण्यात आले. संशय आल्याने आरोपीची झडती घेण्यात आली. त्यानंतर त्याच्या जवळच्या एका प्रोपेलर आणि लोखंडी डिस्क मधून 8 कोटी 81 लाख रुपयांचे 2 किलो 937 ग्रॅम अमली पदार्थ (ड्रग्स) आढळून आले आहे. त्यानंतर सीमा शुल्क विभागाकडून त्याला ताब्यात घेण्यात आले. 

मार्चमध्ये पुण्यातील सर्वात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

 मार्च महिन्यात पुण्याच्या गुन्हे शाखेने ड्रग्स रॅकेटविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये तब्बल 4 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. संदीप धुनिया असे या रॅकेट चालवणाऱ्या आरोपीचे नाव होते. ड्रग्ज जप्त करण्यात आले मात्र, आरोपी धुनिया नेपाळमार्गे कुवेतला फरार झाला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

कल्याण लोकसभेचा सर्व्हे नेगेटिव्ह असल्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाली नसेल; वरुण सरदेसाईंनी शिंदेच्या जखमेवर मीठ चोळलं

 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *