‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री मेघा धाडेने राहुल गांधींवर व्यक्त केला संताप;म्हणाली,तुमचा तिरस्कार…

Megha Dhade : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री मेघा धाडेने राहुल गांधींवर व्यक्त केला संताप; म्हणाली, 'यांना पाठिंबा देणाऱ्यांची लाज...

[ad_1]

Megha Dhade :  लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) वातावरणात अनेक कलाकार मंडळीही मैदानात उतरली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच काही महिन्यांपासूनच अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या राजकीय वाटेचीही निवड केलीये. अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) हीने देखील काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रेवश केलाय. त्यानंतर या अभिनेत्रीच्या पोस्ट या बऱ्याच चर्चेत असतात.  तिने नुकतच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात एक पोस्ट केली आहे. 

मेघाने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर ही पोस्ट करत राहुल गांधी यांच्याविरोधातला संताप व्यक्त केलाय. राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. तसेच या व्हिडिओमध्ये तिने राहुल गांधी यांना टॅग करत तिचा राग व्यक्त केला. पण मेघाने राहुल गांधीवर अशी पोस्ट का केली असा देखील अनेकांना प्रश्न पडलाय. तर या पोस्टमध्ये राहुल गांधींचा जो व्हिडिओ शेअर केलाय, त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. 

मेघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?

भाजपचे नेते राजेश पांडे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरुन शेअर केलाय. जो मेघाने तिच्या स्टोरीला पोस्ट केलाय. यामध्ये राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वारंवार बाजूला सारण्याचा प्रयत्न करतायत. त्यावर राजेश पांडे यांनी ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी आदर नाही त्यांच्या साठी पुणेकरांच्या मनात जागा नाही, कॉंग्रेस च्या राहुल गांधी चा धिक्कार असो , आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर राहुल गांधी ने पुण्याच्या सभेत केला, असा आरोपही त्यांच्यावर केलाय. हिच पोस्ट मेघाने करत राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केलाय. 

मेघा धाडने काय म्हटलं?

मेघा धाडने हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की, जे राहुल गांधी यांना सपोर्ट करतात, त्यांची लाज वाटते. राहुल गांधी मी तुमचा तिरस्कार करते. माझा देश सोडा आणि नर्कात जा. सध्या मेघाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Megha Dhade : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री मेघा धाडेने राहुल गांधींवर व्यक्त केला संताप; म्हणाली, 'यांना पाठिंबा देणाऱ्यांची लाज...

ही बातमी वाचा : 

All The Best : मराठी रंगभूमीवर ‘ऑल दि बेस्ट’ ची जादू कायम, अवघ्या तीन महिन्यांत नाटकाचे 50 प्रयोग

अधिक पाहा..



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *