[ad_1]
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बाप्पाच्या आगमनासाठी घराघरात, सार्वजनिक मंडळांची तयारी जोरात सुरू आहे. या सणानिमित्त सर्वांचा उत्साह शिगेला पोहचतो. बाप्पाची सजावट, खाद्यपदार्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणते पारंपारिक पोशाख घालायचे? हा प्रश्न महिला वर्गाला पडतो. कुठलाही सण आला की काय घालायचे याचे महिलांना खूप टेन्शन असते. पुढील आठवड्यात गणेश चतुर्थी सण येत आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला बी टाऊन सेलिब्रिटींचे काही स्टायलिश पारंपारिक पोशाख दाखवणार आहोत, ज्यातून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता.
शनिवार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा होणार आहे. जर तुम्हाला या दिवशी पारंपारिक आणि स्टायलिश काहीतरी ट्राय करायचे असेल, तर तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींच्या काही एथनिक लुक्सवरून कल्पना घेऊ शकता. आम्ही तुम्हाला असे काही स्टायलिश पोशाख दाखवतोय, ज्यातून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता.
जर तुम्हाला तुमच्या गणेश चतुर्थीच्या पोशाखाबद्दल बोलायचं झालं, तर तुम्ही ग्रीन थीमच्या पोशाखापासून प्रेरणा घेऊ शकता. तिच्या खास लूकमध्ये ब्लाउजसोबत हिरव्या रंगाचा ब्रोकेड स्कर्ट परिधान केला होता. तिचा हिरवा दुपट्टा लुक पूर्ण करत आहे.
हा लूक तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरू शकतो. सोनालीने स्टार वर्क असलेली मेंदी ग्रीन कलरची एम्ब्रॉयडरी साडी घातली होती, जी तिच्या स्मोकी आय मेकअप आणि कानातल्यांनी वाढवली होती. सणांसाठी हा एक योग्य पर्याय आहे.
गणेश चतुर्थीला तुम्ही विविधरंगी पोशाख देखील निवडू शकता. प्रिंटेड ब्लाउज आणि पलाझो प्रिंटेड श्रगसोबत पेअर केला आहे. श्रगमधील लेस विथ टेसेल्सने हा लूक खूप खास बनवला आहे.
गणेश चतुर्थीला तुम्ही या खास लूकमध्ये पांढऱ्या रंगाच्या ब्लाउजसह गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान करू शकता
हेही वाचा>>>
Ganesh Chaturthi 2024 : आतुरता तुमच्या आगमनाची! बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी करा ‘अशी’ फर्स्ट क्लास सजावट, प्रत्येकजण करेल कौतुक
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link