अहमदनगर मध्ये राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद

अहमदनगर – संकटात सापडलेल्या पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी नगर येथे (दि. 13) राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख व राज्य पदाधिकारी उदय नारकर यांच्या उपस्थितीत नगरच्या सैनिक कल्याण समिती लॉन्सवर ही परिषद होणार आहे.
बाळासाहेब दरंदले, बाळासाहेब गडाख, अरविंद देसाई, प्रल्हाद बोरसे, अंकुश पडवळे, दिलीप डेंगळे, किरण अरगडे, महेश शेटे, सुजाता थेटे, मनोज आहेर यांनी परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *