‘काही लोक सांगतात शिंदे आणि पवार साहेबांचं काहीतरी सुरुय, निकालानंतर कोण कोणासोबत जाईल’

[ad_1]

Nawab Malik : “विधानसभेच्या निकालानंतर कोण कोणाच्या सोबत राहिल, आज सांगता येतच नाही. कोणता पक्ष कोणासोबत राहिल हे सांगता येत नाही. काही लोक सांगतात शिंदे साहेब आणि पवार साहेबांचं काहीतरी सुरु आहे. वेगवेगळी चर्चा या महाराष्ट्रात आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठं होतं, आज कुठे गेलाय. लोकांना कसं आणण्यात आलं, हे सगळं मी पाहिलेलं आहे. विधानसभेच्या निकालानंतर काय होणार हे आज स्पष्ट नाही”, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि शिवाजी माणखुर्दचे उमेदवार नवाब मलिक म्हणाले. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

नवाब मलिक म्हणाले, पवार साहेबांसोबत आज जे लोक निवडणूक लढत आहेत, त्यांची वैचारिकता काय आहे? मी विचारधारा सोडलेली नाही. जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी भूमिका घेण्यासाठी थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये सरकार असताना विशालगड असेल किंवा काय? लोक गप्प कशामुळे आहेत? अजितदादा उघडपणे बोलत तरी आहेत. काँग्रेसच्या लोकांना फक्त मत पाहिजेत. काँग्रेसला मुस्लिमांना उमेदवारी द्यायची नाही. फक्त मत पाहिजेत. 

निवडणुकीच्या निकालानंतर कोणाचे संबंध कोठे जोडले जातील, याबाबत संभ्रम आहे. मी माझी विचारधारा कधी सोडलेली नाही. आम्ही समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही पद्धतीने विचार करणारे लोक आहोत. आमच्या शिवाय कोणतं सरकार बनणार नाही. चंद्राबाबू यांनी जो स्टँड घेतलाय, तो स्टँड आम्ही महाराष्ट्रात घेणार आहोत. वैचारिक तडजोड होणार नाही. अजित पवार कायम बोलले आहेत, पॉलिटिकल अॅडजेस्टमेंट आहे, असंही नवाब मलिकांना सांगितलं. 

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, माझ्या बोलण्यावर बंदी होती. आता बंदी उठलेली आहे. मात्र, केसच्या बाबतीत कोणतंही भाष्य करु नये, असं मला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी काही गोष्टींवर बोलू शकत नाही. मी निर्दोष आहे, मला अडकवलं गेलंय हे तर दिसतचं आहे. महाविकास आघाडीचे लोक माझ्यासोबत निवडणुकीत राहणार नाहीत, त्यांना अबू आझमींसोबत राहणे बंधनकारक आहे. ठाकरेंचं सरकार कोणामुळे गेलं हे लोकांना माहिती आहे. 

उद्धव ठाकरेंचं सरकार पडण्याआधी राज्यसभेमध्ये जे मतदान झालं, ते कोणाला झालं याचा पुरावा शोधावा लागेल. जर क्रॉस वोटिंग होऊन कोल्हापूरचे उमेदवार संजय पवार पडले नसते तर ही बंडखोरी झाली नसती. त्यासाठी कारणीभूत अबू आझमी देखील आहेत. विधानसभेला शेकापला 12 मतच मिळाली. यांचे आणि एमआयएमचे दोन मत कुठे गेले. लोकांनी शोधायला पाहिजे. अबू आझमी सर्वांच्या जवळचे आहेत, कागद घेऊन सर्व ठिकाणी फिरतय, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *