Who Is Gukesh D Indian Sensation Who Displaced Viswanathan Anand FIDE World Rankings Know Details

[ad_1]

FIDE Ranking Gukesh D and Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर गुकेश डी (Gukesh D) याने जागतिक क्रमवारी पाच वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) यांना मागे टाकलं आहे. भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवत मोठी कामगिरी केली आहे. 4 ऑगस्ट रोजी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गुकेशने अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून बाजी मारली आहे. सतरा वर्षांच्या गुकेशने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अझरबैजानच्या इसकांद्रोवचा 44 चालींमध्ये पराभव केला.

भारताला मिळाला नवा ‘बादशाह’

किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेशने गुरुवारी बुद्धिबळ विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हचा पराभव केला. यासह, FIDE म्हणजेच Federation Internationale des Echecs च्या थेट जागतिक रेटिंगमध्ये, त्याने आपला आदर्श विश्वनाथन आनंद यांचा पराभव केला आहे. आता गुकेश विश्वनाथन आनंद यांना मागे टाकत जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर विश्वनाथन आनंद या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहेत. 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *