Adah Sharma Announce Break Due To Her Medical Condition Shares Post On Her Instagram Know In Detail News Marathi

[ad_1]

Adah Sharma Announce Break : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदा शर्माला फूड ऍलर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. या वृत्ताला आता अभिनेत्रीने दुजोरा दिला आहे. द केरळ स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.  ज्यामध्ये तिच्या संपूर्ण शरीरावर पुरळ आले आहेत. आता ती अॅलर्जी तिच्या चेहऱ्यापर्यंत पसरली आहे. त्यामुळे आता अदा शर्मा हिने अभिनयापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.   

 अदा शर्माने अॅलर्जीचे फोटो केले इंस्टाग्रामवर शेअर  

“The Kerala Story” फेम अभिनेत्री अदा शर्माने इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत मोठी नोट लिहिले आहे की, “त्या सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी मला काळजीने मेसेज केले. तिने तिच्या फोटोंसह डिस्क्लेमर दिला, त्वचेवर अॅलर्जीचे फोटो पाहून घाबरत असाल तर स्वाइप करू नका. हे थोडे भयानक आहे आणि मला वाटते की फक्त इंस्टाग्रामवर चांगलेच फोटो का पोस्ट करावे.” पुढे तीने लिहिले आहे की, “हे एक भयानक प्रकारचे पुरळ आहेत. जे मी फुल स्लीव्ह कपडे घालून लपवत होते पण तणावामुळे ते आता माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले आहे. यासाठी मी औषध घेतले आणि मला औषधाची ऍलर्जी असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे माझी तब्येत अजून बिघडली. त्यामुळे आता मी इतर औषधे आणि इंजेक्शन घेत आहे.”

अदा शर्माने घेतला ब्रेक

अदा शर्माने लिहिले आहे की,  “माझा वैद्यकीय स्थिती पाहता कामातून थोडा ब्रेक घेत आहे आणि आयुर्वेदिक उपचार घेईल.  आईला वचन दिले आहे की, मी माझ्या तब्येतीची काळजी घेईन. माझ्या आईने मला रेडिओ ट्रेल्स, झूम इंटरव्ह्यू आणि प्रोमोज ऐवजी तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. ‘मी लवकरच परत येईन’ असेही अदाने लिहिले आहे.”

कधी रिलीज होणार कमांडो?

कमांडो ही वेब सीरिज 11 ऑगस्ट रोजी Disney Plus Hotstar  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘कमांडो’ ही वेब सीरिज ‘कमांडो’ फ्रँचायझीमधील आहे. ‘कमांडो’ फ्रँचायझीचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. या चित्रपटांची निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे. कमांडो फ्रँचायझीची सुरुवात 2013 मध्ये ‘कमांडो: ए वन मॅन आर्मी’ या चित्रपटानं झाली, ज्यामध्ये विद्युत आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत होते. आता प्रेम आणि अदा ‘कमांडो’ या वेब सीरीजमध्ये दिसणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Indian Actor in China: चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय अभिनेत्याचा डंका; बॉलीवूडमधील अभिनेत्यांनाही देतोय टक्कर



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *