[ad_1]
Ayushmann Kurrana On Dream Girl 2 : आयुष्मान खुराना त्याच्या विविध भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतो. आयुष्मानने अगदी कमी काळात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान हा त्याच्या ड्रीम गर्ल-2 या चित्रपटाचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पूजाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.
या चित्रपटात आयुष्मान हा मुलीच्या रुपात दिसतोय. तो लोकांचे मनोरंजन करतो आणि फोनवर पूजाचा आवाज काढून लोकांसोबत गप्पा मारतो आणि पैसे कमावतो. नुकतच ड्रीम गर्ल 2 चं दिल का टेलिफोन 2.0 हे गाणे शेवटच्या दिवशी रिलीज झाले आहे. या गाण्यात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेची मस्ती पाहायला मिळत आहे, तर पूजाचा जबरदस्त डान्सही दिसत आहे.
आयुष्यमानने सांगितला ड्रीम गर्लचा मजेदार किस्सा
पूजाची भूमिका साकारण्यासाठी आयुष्मान कशी तयारी केली याबाबत सांगतांना आयुष्यामनं सांगितलं की, “माझ्या रेडिओ जॉकी आणि थिएटरच्या कामामुळे मला खरोखरच खूप मदत झाली. मी जेव्हा रेडिओ स्टेशनवर काम करायचो तेव्हा मी अनेकदा मुलींच्या आवाजात प्रँक काँल करायचो. “या सोबतच त्याने अजून एक किस्सा सांगितला तो म्हणाला, जेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी फोन करायचा तेव्हा तिचे वडील फोन उचलायचे तर तो त्यांच्याशी तिच्या मैत्रिणीच्या आवाजात बोलायचा.
“Used to imitate woman’s voice whenever my first girlfriend’s landline call was picked up by her dad,” recalls Ayushmann Khurrana
Read @ANI Story | https://t.co/gIbZOVVfvb#AyushmannKhurrana #DreamGirl #DreamGirl2 pic.twitter.com/ETDyuy7P3Q
— ANI Digital (@ani_digital) August 10, 2023
कधी रिलीज होणार ‘ड्रीम गर्ल 2’? (When will ‘Dream Girl 2’ be released?)
एकता आर कपूर आणि शोभा कपूर निर्मित ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबतच अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, विजय राज आणि राजपाल यादव हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ‘ड्रीम गर्ल-2’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामधील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता ‘ड्रीम गर्ल-2’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
.
[ad_2]
Source link