Delhi Indrapuri Murder Father Ex Girlfriend Killed His 11 Year Old Son

[ad_1]

नवी दिल्ली : 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येने देशाची राजधानी दिल्ली (Delhi) हादरली. मुलाचा मृतदेह  घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली त्यानंत आता या प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यसाठी तरूणीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर कोणाला कळू नये यासाठी बेडमध्ये मृतदेह लपवला. मात्र 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्यांकांड उघडकीस आले आहे. 

दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने 11 वर्षीय दिव्यांश (बिट्टू) ची गळा घोटून हत्या केली. त्यानंतर चिमुकल्या बिट्टूचा मृतदेह बेडमध्ये लपून ठेवला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 24 वर्षीय पूजाला अटक केली आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसर, बॉयफ्रेंडने केलेल्या फसवणुकीमुळे पूजाच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे पूजाने रागाच्या भरात  चिमुकल्या बिट्टूची हत्या केली.10 ऑगस्ट रोजी दुपारी बिट्टू घरात झोपला होता. त्यावेळी पूजाने त्याचा गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृचदेह बेडमध्ये लपून ठेवला,

पूजा आणि जितेंद्र 2019 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जितेंद्रने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन पुजाला दिले होते.परंतु 2022 साली जितेंद्र पूजाला सोडून आपल्या पत्नीकडे परतला आणि पत्नी आणि मुलासोबत राहायला लागला. या सगळ्या प्रकारानंतर पूजा चिडली होती. जितेंद्रचा राग तिच्या मनात होता. पूजा आणि जितेंद्रच्या नात्यामध्ये बिट्टू येत असल्याने जितेंद्र लग्नाला विरोध करत आहे असे पूजाला वाटत होते. त्यामुळे त्याला 
 धडा शिकवण्यासाठी पुजाने हे पाऊल उचलले. 

10 ऑगस्टला केली हत्या

10 ऑगस्टला एक कॉमन मित्राच्या मदतीने पुजाने जितेंद्रच्या घराचा पत्ता विचारला.त्यानंतर पूजा जितेंद्रच्या घरी पोहचली तर घराचा दरवाजा उघडा होत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पूजा ज्यावेळी घरी पोहचली त्यावेळी घरी कोणी नव्हते. बिट्टू त्यावेळी बेडवर झोपला होता. पूजाने घरात कोणी नाही ही संधी जितेंद्र आणि तिच्या नात्यात अडसर असलेल्या बिट्टूचा गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपून पळून गेले.

पूजापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी 300 कॅमेराची मदत घेतली. त्यानंतर पूजाला शोधण्यासाठी नजफगढ़-नागलोई रोड येथील रनहौला, निहाल विहार आणि रिशल गार्डन परिसरातील 300 सीसीटीव्ही कॅमेरा तपासले. त्यानंतर तीन दिवसांनी पूजाला बक्कारवाला परिसरातून अटक केली. अटक केल्यानंतर पुजाने हत्येची कबुली दिली.

हे ही वाचा :

मुंबईमध्ये वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर! सेलोटेपने हातपाय बांधले,तोंडात कापसाचा बोळा कोंबला; ताडदेवमध्ये वृद्ध महिलेची हत्या

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *