Marathi Artists Praised Sushmita Sen Tali Web Series Share Post On Social Media

[ad_1]

Taali: अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen)‘ताली’  (Taali)  ही वेब सीरिज 15 ऑगस्टला या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या सीरिजमधील सुष्मिताच्या अभिनयाचं तसेच या सीरिजच्या कथानकाचं अनेकजण कौतुक करत आहेत. आता काही मराठी कलाकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ताली या वेब सीरिजचं कौतुक केलं आहे.

सुबोध भावेनं शेअर केली पोस्ट

अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ताली या वेब सीरिजचं कौतुक केलं. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, ‘श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत ताली ही अप्रतिम वेब मालिका  जियो सिनेमावर पाहिली. बस बाई बस या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. क्षितिज पटवर्धन, मित्रा त्यांचे संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस त्याला तोड नाही. खूप खूप कौतुक तुझे. हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, नंदू माधव, तुम्ही तुमच्या भूमिका किती सुंदर साकारल्या आहेत.कार्तक डी निशांदर , अर्जुनसिंह बरन मित्रांनो अशी निर्मिती करायला धाडस लागतं.अप्रतिम! जियो सिनेमा मनापासून धन्यवाद ही मालिका सादर केल्याबद्दल.

रवी जाधव देवा, तुझ्या प्रत्येक कलाकृती मध्ये तुझा खास असा ठसा असतो.या कलाकृतींमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेलाय. प्रेम! कृतिका देव,गणेश- गौरी ही व्यक्तिरेखा उभी रहाण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. सुष्मिता सेन तुम्ही त्या झाला होता.बस इतकेच.श्री गौरी सावंत,तुम्हाला मनापासून वंदन’


हेमंत ढोमेची पोस्ट

हेमंत ढोमेनं पोस्ट शेअर करुन लिहिलं, ‘पावरफुल स्टोरी, उत्कृष्ट लेखन, प्रामाणिक आणि धाडसी कथा, सुपर कामगिरी, अभिनंदन टीम’

सखी गोखलेची पोस्ट

सखी गोखलेचा पती सुव्रत जोशीनं ताली या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. सखीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुव्रतचं आणि ताली या वेब सीरिजच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

दिग्दर्शक रवी जाधव या वेब सीरिजचं दिग्दर्शिन केलं आहे. तसेत क्षितीज पटवर्धन हे या वेब सीरिजचं लेखन आहेत.  

वाचा इतर सविस्तर बातम्या:

Taali: लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार; सुष्मिताची ‘ताली’ मराठी सेलिब्रिटींची

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *