[ad_1]
Amitabh Bachchan Aishwarya Rai Bachchan On Abhishek Bachchan Ghoomer : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा ‘घूमर’ (Ghoomer) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील या सिनेमाचं आणि अभिषेकच्या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील लेकांचं कौतुक केलं आहे. तसेच ऐश्वर्या राय बच्चनलाही ‘घूमर’ आवडला आहे.
‘घूमर’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिषेक बच्चनने पाच वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. आता ‘घूमर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक खास ब्लॉग लिहित लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे,”आज एक वडील म्हणून मला तुझा अभिमान वाटतो आहे. या तरुण वयात तू या गुंतागुंतीच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहेस. ही गुंतागुंतीची व्यक्तिरेखा तू यशस्वीपणे साकारली आहेस”.
T 4741 – Abhishek I can say this as a Father, yes, but also as a member of the fraternity we both belong to ..
At this young age and in the time period, you have performed in the most complex characters in film after film .. all different convincing and all successful .. ❤️— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 17, 2023
अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चननेही (Aishwarya Rai Bachchan) ‘घूमर’ या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी दिलं आहे. वीरेंद्र सेहवागनंही (Virender Sehwag) ‘घूमर’ हा सिनेमा पाहिला आहे. खेळाडूचा संघर्ष काय असतो हे दाखवणारा ‘घुमर’ सिनेमा आहे, असं म्हणत त्याने खास पोस्ट लिहिली आहे.
‘घूमर’बद्दल जाणून घ्या… (Ghoomer Movie Details)
‘घूमर’ हा सिनेमा 18 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त 0.85 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाचं ओपनिंग डे कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. ओपनिंग डेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाला यश आलेलं नाही.
‘घूमर’ या सिनेमात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहे. अभिषेक या सिनेमात एका क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. आर. बाल्की (R. Balki) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शिवेंद्र सिंह आणि इनवाका दासही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महिला क्रिकेटर अनिनीच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या
Ghoomer Movie Review : अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ कसा आहे? वाचा रिव्ह्यू…
.
[ad_2]
Source link