दहीहंडीच्या डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी; चौघांवर गुन्हा दाखल

[ad_1]

पुणे : दहीहंडी (Dahi Handi) कार्यक्रमासाठी गणेश पेठेतील पांगुळ आळी येथे लायटिंग करण्यासाठी लावलेला लोखंडी पाईपचा सांगाडा कोसळला होता. यात चार महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी आता मंडळाच्या पदाधिकार्‍यांबरोबरच चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राहुल चव्हाण (रा. गणेश पेठ), अजय बबन सांळुखे,  गोपी चंद्रकांत घोरपडे (रा. गणेश पेठ) आणि चेतन/सनी समाधान आहिरे (रा. खराडी) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश लालचंद चंगेडिया यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. काल साडे दहा वाजता हा प्रकार घडला होता  या घटनेत मंदा लालचंद चंगेडिया (वय 67), निर्मलादेवी नवीन पुनमिया (वय 69), केवलचंद मांगिलाल सोळंकी (वय 66) आणि ताराबाई केवलचंद सोळंकी (वय 64) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दहीहंडी उत्सवासाठी पुण्यात मागील दोन दिवस जोरदार तयारी सुरु होती. त्यासाठी प्रत्येक चौकात लाईट आणि डीजे सिस्टिम उभारण्यात येत होती. त्यासाठी गणेश पेठेतील पांगुळ आळीl  लोखंडी पाईपचा सांगाडा उभारण्याचे काम सुरु होते. सादडी सदन येथे काही महिला आल्या होत्या. सांगाडा उभारण्याचे काम सुरु असताना त्याच्या एका खांबाला दुचाकीचा जोरात धक्का लागला. त्यामुळे हा संपूर्ण सांगाडा खाली कोसळला. त्यातील पाईपला लागून चार ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्या. सुरक्षित साधनाचा न करता सिस्टिम उभारण्यात आली असल्याचा आरोप महिलांनी केला. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सगळं झाल्यावर आज या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

कुठे राडा तर कुठे सामाजिक सलोखा…

याच प्रकारचे लहान मोठे अपघात पुणे शहरात दहीहंडीच्या निमित्ताने झाल्याचं पाहायला मिळालं. बाणेर, बालेवाडी, हिंजवडीसारख्या परिसरातदेखील मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. काही ठिकाणी राडेदेखील झाले तर काही ठिकाणी सामाजिक सलोखा राखल्याचं दिसून आलं. शिवाय तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं वेगळं गोविंदा पथक स्थापन करण्यात आलं होतं. त्यांनीदेखील मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. मात्र या सगळ्यात काही ठिकाणी उत्सावाचा जल्लोष दिसला तर काही ठिकाणी उत्सवाला गालबोट लागलं. 

इतर महत्वाच्या बातम्या :

Dahihandi Pune : दहीहंडी जल्लोषाला गालबोट; कुठे धारदार शस्त्राने वार तर कुठे हाणामारी…

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *