Aadesh Bandekar Suchitra Bandekar Love Story Home Minister Baipan Bhaari Deva Know Entertainment Latest Update

[ad_1]

Aadesh Bandekar Suchitra Bandekar Lovestory : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) सध्या ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. 

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील नावाजलेलं कपल आहेत. त्यांच्या लग्नाला 30 वर्षांपेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. पण त्यांची लव्हस्टोरी मात्र खूपच फिल्मी आहे. 1990 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. 50 रुपयांचं खोटं मंगळसूत्र ते पळून जाऊन लग्न अशी आदेश-सुचित्रा यांची स्ट्रगलवाली लव्हस्टोरी आहे.

सुचित्रा बांदेकर या शाळेत असल्यापासून अभिनय क्षेत्रात काम करत होत्या. शाळेत असतानाच त्यांनी ‘रथचक्र’ ही मालिका केली होती. या मालिकेच्या शूटिंगसाठी आदेश बांदेकरदेखील मालिकेच्या सेटवर गेले होते. त्यावेळी त्यांनी सुचित्रा यांना पहिल्यांदा पाहिलं आणि प्रेमातच पडले. 

आदेश-सुचित्रा बांदेकर यांची स्ट्रगलवाली लव्हस्टोरी…

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची पुढे चांगली मैत्री झाली. दरम्यान आदेश बांदेकर यांनी त्यांच्या मनातल्या भावना सुचित्रा यांना सांगितल्या. पण त्यावेळी सुचित्रा यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर एकेदिवशी आदेश यांनी सुचित्रा यांना भेटायला बोलावलं होतं. सुचित्रा यांनीदेखील भेटण्यासाठी होकार दिला होता. त्यामुळे ठरलेल्या जागी आदेश बांदेकर त्यांची वाट पाहत थांबले. पण सुचित्रा मात्र त्यांच्या मैत्रीनींसोबत फिरायला गेल्या. त्यानंतर आदेश यांनी थेट सुचित्रा यांचं घर गाठलं आणि थेट प्रपोज केला. त्यावेळी मात्र सुचित्रा यांनी आदेश बांदेकरांना होकार दिला. 

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर एकमेकांच्या प्रेमात होते. पण त्यांच्या घरच्यांना मात्र त्यांचं प्रेम मान्य नव्हतं. आदेश बांदेकरांचा इंडस्ट्रीत स्टगल सुरू असल्याने सुचित्रा यांनी त्यांच्या घरच्यांना त्यांच्याबद्दल काहीही सांगितले नव्हते. पण नंतर त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्लासचं कारण देत सुचित्रा घराबाहेर पडल्या आणि थेट आदेश यांना बांद्रा न्यायालयात भेटल्या. फक्त 50 रुपयांमध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नात आदेश यांनी सुचित्रा बांदेकर यांनी 500 रुपयांचं खोटं मंगळसूत्र घातलं होतं. एकच सोन्याचा मुहूर्तमणी त्यांनी घेतला होता. पुढे कामं मिळू लागल्यानंतर आदेश बांदेकर यांनी सुचित्रा बांदेकर यांना त्यांच्या आवडीचं मंगळसूत्र केलं.

संबंधित बातम्या

Suchitra Bandekar: ‘दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश…’; सुचित्रा बांदेकर यांचा खास उखाणा, व्हिडीओ व्हायरल

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *