Aai Kuthe Kay Karte Anirudh Locks Isha In The Room Promo Viral

[ad_1]

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये सध्या मोठा ट्वीस्ट अँड टर्न येत आहेत. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की अनिरुद्ध हा ईशाला एका खोलीमध्ये कोंडत आहे.

आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अनिरुद्ध हा ईशाला खोलीत कोंडतो. देशमुख कुटुंब त्याला आडवायला येतं पण अनिरुद्ध म्हणतो, ‘खबरदार कोणी पुढे आलं तर,आतापर्यंत मी ईशाचा अल्लडपणा समजून सगळं सोडून दिलं, पण आता बघा मी काय करतो ते.’

‘काय करणार आहेस तू मनात काय आहे तुझ्या असं’, कांचन आजी अनिरुद्धला विचारतात. त्यानंतर आजोबा म्हणतात, ‘अनिरुद्ध मागच्या वेळी सुद्धा तू असं वागला होता. तेव्हा ईशा पळून गेली होती.’ यावर अनिरुद्ध म्हणतो. पण यावेळी मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. माझ्या परवानगी शिवाय ती या घरातून बाहेर पडता कामा नये. तिला जो कोणी मदत करेल त्यानं हे घर सोडून जावं. मी ईशासाठी एक स्थळ पाहिलं आहे. माझ्या मित्राचा मुलग आहे. तो हुशार आहे.मी त्याला बोलवून घेतो. ईशाचं लग्न त्याच्यासोबतच होणार.’ यावर ईशा ‘नाही नाही’ , असं ओरडते. ‘दोन दिवसाच्या आत ईशाचं लग्न नाही लावून दिलं, तर नावाचा अनिरुद्ध नाही.’ असं अनिरुद्ध म्हणतो.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘ईशाला कोंडणं चुकीचच आहे.पण एवढे सगळे नुसते बघत बसले आहेत, हे पण चुक आहे . अभी ,यशमध्ये का पडले नाही आणि त्यांनी अनिरुद्धला धरुन ईशाला सोडवले.का ती अनघा ,संजना फक्त तोंड चालवत होत्या त्यापेक्षा कृती महत्वाची होती. ती ईशा तरी काय लग्न लग्न करत बसली नुसती. या प्रसंगातून काय दाखवले बरं.अन एवढ करुनही ईशाचं आईला पाण्यात पहाणं काही कमी होत नाही.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘बंद करा आता ही सीरिअल’


‘आई कुठे काय करते’ या मालिकेत  मधुराणी प्रभूलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात. तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. आता ईशा आणि अनिशचं लग्न होणार की नाही? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aai Kuthe Kay Karte: ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची खरेदी; ईशा 35 हजाराचा घागरा घेणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *