Abhishek Bachchan Film Ghoomer Reviewed By Sachin Tendulkar Saiyami Kher Share Video

[ad_1]

Ghoomer Reviewed By Sachin Tendulkar: अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या घुमर (Ghoomer) या चित्रपटाची चर्चा सध्या होत आहे. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. आता  सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन घुमर या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

सचिन तेंडुलकरची पोस्ट

सचिननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतो, “मी नुकताच घूमर पाहिला आणि हा एक अत्यंत प्रेरणादायी चित्रपट आहे. जोश, इच्छाशक्ती,स्वप्न  यांना कोणतीच सीमा नसतात. हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, मला हे जाणवले आहे की, आयुष्यात चढ-उतार असतात आणि नेमके तेच हा चित्रपट आपल्याला दाखवतो.  अपयश, दुखापती आणि निराशा, ते तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवतात आणि याच विषयावर हा चित्रपट आहे. मी तरुणांसाठीही म्हणेन की, हा चित्रपट तुम्हाला इतकं शिकवू शकतो की, आयुष्यात कधीही हार मानू नका आणि सर्व आव्हानांवर मात करा.  जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हाने येणार आहेत. ते आव्हान स्विकारुन जिंकण्यातच मजा आहे.”

सैयामीनं शेअर केला व्हिडीओ

सैयामी खेरनं एक खास व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सचिन तेंडुलकरसमोर बॉलिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं,’लहानपणीचे तुमचे असे कोणते स्वप्न आहे जे कधीच पूर्ण होणार नाही असा विचार तुम्ही केला होता?  माझे असे स्वप्न होते की, एकेदिवशी मला माझा नायक, माझी प्रेरणा, माझे शिक्षक सचिन तेंडुलकर यांना भेटायला मिळेल. त्यांना खेळताना पाहूनच मला या खेळाबद्दल आवड निर्माण झाली आणि मी हा खेळ शिकले. त्यांना खेळताना पाहण्यासाठी मी कॉलेज बंक केले आहे.’

पुढे तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘चेन्नई येथे 136, शारजाह स्टॉर्म, सिडनी येथे 241, पाकिस्तान विरुद्ध 98, ही यादी अंतहीन आहे.त्यांनी मला आनंद दिला, त्यांनी मला कसे लढायचे हे शिकवले, त्याने मला उत्कटतेने शिकवले, जमिनीवर कसे राहायचे हे शिकवले. नकळत त्यांनी मला कसं जगायचं हे शिकवलं. जेव्हा मी अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितलं, जा जा, अभिनय कर. एक दिवस सचिन तुझा चित्रपट बघेल. आणि तेच माझे ध्येय बनले. कठोर परिश्रम करणे आणि आशा करणे की, एखाद्या दिवशी मास्टर माझे काम पाहतील. आणि मग असे घडले की, क्रिकेटच्या देवाने चित्रपट पाहिला ज्यामध्ये मी क्रिकेटरची भूमिका केली आहे. क्रिकेटच्या देवाने मला घूमरची गोलंदाजी कशी केली? हे दाखवायला सांगितले. स्वप्ने खरोखरच सत्यात उतरतात. माझ्या आयुष्याच्या या टप्प्याला आनंद म्हणतात.’


महत्वाच्या इतर बातम्या :

Ghoomer: ‘मी स्पिनरला रिस्पेक्ट देत नाही, पण…’ ;अभिषेक बच्चनचा घुमर पाहिल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं दिली प्रतिक्रिया

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *