Accident News: काळ आला होता पण…. धाराशीवमध्ये एसटी बसचा ब्रेक फेल, पुलाचा कठडा तोडून गाडी नदी

[ad_1]

धाराशीव: ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असा काहीसा प्रकार तेर – ढोकी रस्त्यावरील तेरणा नदीच्या पुलावर घडल्याचं दिसून आलं. एका राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात सुदैवाने थोडक्यात वाचला, बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पुलाच्या कठड्याला धडकली. सुदैवाने बस पुलावरून नदीपात्रात कोसळण्यापासून वाचली. या अपघातात बस मधील 10 ते 15 प्रवाशांना किरकोळ दुखापती झाली आहे. काल (गुरुवारी) बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

तेर – ढोकी रस्त्यावरील तेरणा नदीच्या पुलावर एका राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात होताना थोडक्यात वाचला. या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने बस पुलावरून नदीपात्रात कोसळण्यापासून वाचली. या घटनेत बस मधील 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला आहे. मात्र, बस चालकाने प्रसंगावधान राखत बस पुलावरून खाली पडण्यापासून वाचवली. या घटनेमुळे प्रवासी मोठ्या प्रमाणावर घाबरले होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *