Actress Tamannaah Bhatia Fan Breaks Security, Grabs Her Hand At Event Her Reaction Goes Viral; Watch News Marathi

[ad_1]

Tamanna Bhatia Fan Video : तमन्ना भाटीया सध्या चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळेही सध्या ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतेच तिचे कावाला हे आयटम साँग रिलीज झाले आहे. तमन्नाची एक खासियत आहे. ती आपल्या फॅन्सना कधीच नाराज करत नाही. कोणत्याही ठिकाणी ती गेली तरी तिच्या फॅन्ससोबत फोटो काढते. अशातच ती एका कार्यक्रमात गेलेली असताना तिच्या एका फॅनने  कोणालाही न जूमानता अचानक येऊन तिचा हात धरला. मात्र तिने त्याला नाराज न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तो क्षण सांभाळून घेतला. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून तमन्नाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. 

काय आहे व्हिडीओ 

सोशल मिडीयावर तमन्नाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तिचा एक फॅन कोणालाही न जूमानता तिच्याजवळ गेला होता. त्यावेळी मग तमन्नानेच बॉडीगार्डला समजावून त्या चाहत्याला एक फोटो घेऊ दिला. व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर होत होती. तर तमन्नाने तिचे आणि विजयचे अफेअर असल्याचे देखील मान्य केले आहे. लस्ट स्टोरीज-2 द्वारे ही जोडी प्रेक्षकांच्या समोर आली. तर यात  तमन्ना आणि विजय यांचे काही इंटिमेट सीन्स प्रेक्षकांना बघायला मिळाले.  इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबाबत एका मुलाखतीमध्ये तमन्नानं सांगितलं की, ‘विजयसोबत  इंटिमेट सीन्सचं शूटिंग करत असताना मला सुरक्षित वाटले.’ मात्र या सीनमुळे गेल्या काही दिवसात लोकांच्या चर्चेचा विषय बनली होती. इंस्टाग्रामवर तमन्नाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तमन्ना भाटिया लवकरच रजनीकांतसोबत जेलर या चित्रपटात दिसणार आहे. 10 ऑगस्ट रोजी तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाले आहे. ती अखेरची लस्ट स्टोरीज २ मध्ये दिसली होती. यात तमन्नासोबत विजय वर्मा दिसला होता. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. रिलीजच्या काही दिवस आधी, तमन्ना आणि विजयने त्यांचे नाते आॅफिशीअल केले.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Alia Bhat : आलिया भट्टचं ‘हार्ट ऑफ स्टोन’ची अभिनेत्री गॅल गॅडोटशी खास कनेक्शन, हॉलीवूड अभिनेत्रीला शिकवला नमस्कार

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *