[ad_1]
शिरुर, पुणे : अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे ही इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्यापासून ते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत. म्हणूनच कदाचित आढळरावांनी लांडेंची भेट घेतली. या भेटीनंतर आढळरावांनी लांडे नाराज नसल्याचं म्हटलंय.
उमेदवारी ज्यांना भेटेल त्याचा प्रचार करायचं, असं आमच्या दोघांमध्ये ठरलं होतं. त्यानुसार मला उमेदवारी मिळाल्यानं आता लांडे माझा प्रचार करतील, असा दावा आढळरावांनी केला. मात्र विलास लांडे अद्याप त्यांची भूमिका कॅमेऱ्यासमोर जाहीर करत नाही आहे. त्यामुळं ते आढळरावांचा प्रचार करणार का? हा प्रश्न कायम आहे.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link