[ad_1]
<p>अजित पवारांनी अर्थखात्याचे सूत्रे हाती घेताच आठवडाभरात राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव केलाय. अजित पवारांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला असून, त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद केलीय. शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर करत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न अजित पवारांनी केलाय. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. </p>
[ad_2]
source
Ajit Pawar : अजित पवारांकडून आमदारांवर निधीचा वर्षाव, शिंदेंच्या नाराज आमदारांनाही दिला भरघोस निधी
