[ad_1]
बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल शरद पवारांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. ते बारामतीमध्ये (Baramati) पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. विशेष म्हणजे अशाच आशयाचं वक्तव्य गुरुवारी (24 ऑगस्ट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं होतं. त्या वक्तव्याला आज थोरल्या पवारांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न राजकारणात रस असणाऱ्यांना पडू लागला आहे.
वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही : शरद पवार
राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते आहेत असं काल काहींनी जाहीर केलं, असं पत्रकारांनी संवादादरम्यान म्हटलं. यावर शरद पवार म्हणाले की, “ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे.”
.
[ad_2]
Source link