All You Need To Know About The Asia Cup 2023 India Pakistan Nepal Afghanistan Bangladesh Asia Cup 2023 Schedule Teams Live Score Points Table

[ad_1]

Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या रनसंग्रामाला बुधवारपासून (30 ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना होईल. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट प्रकारात खेळवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक संघ आपल्या ताकदीने मैदानात उतरणार आहे.  उद्घाटनाचा सामना 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान-नेपाळ या संघात होईल, तर अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्यासह स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जातील. त्यानंतर आशियाचा किंग कोण ? हे समजणार आहे. आशिया चषकासंदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊयात…

हायब्रिड मॉडेलनुसार आशिया चषक – 

यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण भारताने पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्यास नकार दिला. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवली जाईल, असे निश्चित झाले. याअंतर्गत मुल्तान आणि लाहोर येथे आशिया चषकाचे 4 सामने खेळले जातील, तर श्रीलंकेत 9 सामने होतील.

सहा संघ, स्पर्धा कशी रंगणार ?

आशिया चषकात एकूण सहा संघ भाग घेत आहेत, त्यांना दोन गटात विभागले आहे. अ गटात भारत, नेपाळ आणि पाकिस्तान संघांना ठेवण्यात आलेय.  तसेच, ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यानंतर सुपर 4 फेरीत दोन्ही गटातील अव्वल 2 संघ एन्ट्री करतील. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी एक वेळा भिडतील. त्यामधील आघाडीचे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.  

सामने कधी होणार सुरू?

आशिया चषक 2023 स्पर्धेचे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3 वाजता खेळले जातील. भारत, श्रीलंका आणि उपखंडातील कोणत्याही भागात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हे सर्व सामने पाहता येतील. तसेच, डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. त्याशिवाय एबीपी माझावरही यासंदर्भात सर्व माहित मिळेल.

 पाहा संपूर्ण वेळापत्रक

















तारीख फेरी सामना ठिकाण कधी होणार सामना
30 ऑगस्ट 2023 1 पाकिस्तान vs नेपाळ मुल्तान, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
31 ऑगस्ट 2023 1 बांगलादेश vs श्रीलंका कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
2 सप्टेंबर 2023 1 पाकिस्तान vs भारत कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
3 सप्टेंबर 2023 1 बांगलादेश vs अफगाणिस्तान  लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
4 सप्टेंबर 2023 1 भारत vs नेपाळ  कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
5 सप्टेंबर 2023 1 श्रीलंका vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
6 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs B2 लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) B1 vs B2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs A2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs B1  दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता

सहा संघात कोण कोणते शिलेदार आहेत… 

गतविजेत्यांनी कुणाला दिली संधी, पाहा श्रीलंकेचा संघ –

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, चैरिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, डुनिथ वेललेज, महीश थीक्षाना, प्रमोद मदुशन, कसुन राजिथा, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना.

आशिया चषकासाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ 

अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, इमाम उल-हक, बाबर आजम (कप्तान), सलमान आघा, टी. ताहीर, साऊद शकील, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, फहीम अशरफ, हारिस राउफ, मोहम्मद वसीम जूनियर, नादिर शाह, शाहीन आफ्रिदी.

आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ :

शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तंजिद तमीम, नजमुल हुसैन शंटो, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसैन, अफीफ हुसैन , शोरफुल इस्लाम, एबादोत हुसैन, मोहम्मद नईम

आशिया चषकासाठी आफगाणिस्तानच्या संघात कोण कोणते शिलेदार? 

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, राशिद खान, गुलबदीन नैब, करीम जनत, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, सुलिमान सफी, फजलहक फारूकी. 

नेपाळचे शिलेदार कोणते ?

रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्टेल, आसिफ शेख, भीम शर्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतीश जीसी, मौसम ढकाल, संदीप जोरा , किशोर महतो आणि अर्जुन साउद. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *