[ad_1]
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तुफान पावसामुळे पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट धोकादायक बनला आहे. आणि त्यामुळे, पुढील १५ दिवस हा घाटरस्ता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. आंबेनळी घाट रस्ता हा अरुंद आणि तीव्र वळणांचा असून रस्त्याच्या बाजूला असणारा डोंगरकडा पावसामुळे खचून त्यावरील माती आणि मोठमोठे दगड रस्त्यावर आलेत. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीला धोकादायक असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतुक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. म्हणून प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय.
[ad_2]
source