Arjun Kapoor Malaika Arora Go On Lunch Date After Breakup Rumors Video Goes Viral Marathi News

[ad_1]

Arjun Kapoor Malaika Arora : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका आरोरा  (Malaika Arora) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर सुरु असते. अनेक जण अर्जुन आणि मलायका यांना त्यांच्या वयातील असलेल्या अंतरामुळे ट्रोल करतात. पण सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होत्या. या दोघांनी एकमेकांच्या नातेवाईकांना अनफॉलो केल्याने दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये खरंच काहीतरी तथ्य आहे, अशी चर्चा सुरु झाली. मात्र आता ते दोघे काल रात्री डिनर डेटवर जातानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. यादरम्यान अर्जुन त्याची लेडी लव्ह मलायकासाठी खूप प्रोटेक्टिव्ह दिसत होता.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा रविवारी (27 ऑगस्ट) रात्री मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटसाठी जाताना दिसले. दोघांनाही असे एकत्र पाहून चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तर चाहत्यांनी मलायकाच्या आऊटफिटचे खूर कौतुक केले जात आहे. तिने पँट आणि ब्लेझरसह पांढरा ब्रॅलेट टॉप घातला होता. 

अर्जुन-मलायकाला एकत्र पाहून चाहते खूश 

अर्जुन आणि मलायकाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे चाहते खूपच खूश आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे की, “त्यांचे ब्रेकअप झाले नाही हे पाहून आनंद झाला.” एका युजरने कमेंट केली, “तुमची जोडी छान दिसते.” लंच डेटवर दोघे एकत्र दिसल्याने ब्रेकअपच्या अफवांना आता पूर्णविराम लागला आहे. 


मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपचे कारण हे ठरले

आतापर्यंत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी ब्रेकअपच्या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या दोघांच्या ब्रेकअपचे कारण ठरले कुशा कपिला. खरंतर, अर्जुनसोबत कुशाचा एक फोटो समोर आला होता, ज्यानंतर लोक म्हणू लागले की दोघेही डेट करत आहेत. 

मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. गेल्या काही महिन्यांपासून मलायकाचं नाव अर्जुनसोबत जोडलं जात आहे. मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते.  तर अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani: ‘तुमच्या आई वडिलांचं अरेंज मॅरेज झालं होतं की लव्ह मॅरेज?’; चाहत्याचा प्रश्न, गश्मीर महाजनी उत्तर देत म्हणाला, ‘त्यांचे..’

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *