Arun Kadam Daughter News Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Arun Kadam Became Grandfather Daughter Sukanya Kadam Blessed With Baby Boy Good News Marathi Entertainment Television

Arun Kadam Daughter News Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Arun Kadam Became Grandfather Daughter Sukanya Kadam Blessed With Baby Boy Good News Marathi Entertainment Television

[ad_1]

Arun Kadam Daughter News : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम अरुण कदम (Arun Kadam) सध्या चर्चेत आहेत. विनोदवीर अरुण कदम यांच्या घरी तान्हुल्याचे आगमन झाले आहे. लाडका दादूस अर्थात अरुण कदम यांची लेक सुकन्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे दादूसचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

अरुण कदम यांनी काही दिवसांपूर्वी लेकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी जावयाचा अधिकमास सण धुमधडाक्यात साजरा केला. आता त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. इंस्टास्टोरीच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अरुण कदम यांनी काही महिन्यांपूर्वी लेकीच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

अरुण कदम आजोबा झाल्याने चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अरुण कदम यांची लेक 2021 मध्ये सागर पोवाळेसोबत लग्नबंधनात अडकली. शाही थाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अरुण कदम यांचा जावई अर्थात सागर पोवाळे हा कमर्शिअल आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनर आहे. तर सुकन्या भरतनाट्यम शिकलेली आहे. वडिलांसोबत अनेकदा ती रील व्हिडीओ बनवत असते. 

अरुण कदम यांच्याबद्दल जाणून घ्या… (Who Is Arun Kadam)

अरुण कदम हे सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात विविध विनोदी भूमिका साकारत ते प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत असतात. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. त्यामुळे लाडक्या दादूसवर प्रेक्षक नेहमीच प्रेम करतात. 

अरुण कदम सिनेमा, मालिका आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेसोबत चर्चेत असण्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात.  सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अरुण कदम हे अस्खलित आगरी-कोळी भाषा बोलतात. अल्पावधीतच प्रेक्षकांना निखळ आनंद देणारे विनोदवीर म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा अनेक कार्यक्रमांचा ते भाग आहेत. 

संबंधित बातम्या

Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चाहते म्हणाले,”ओंकार भोजनेला परत आणा”

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *